पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर असून त्यांनी एआय समिटमध्ये भाषण केले. नरेंद्र मोदींनी एआय शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि त्याचे सह-अध्यक्ष म्हणून आमंत्रित केल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एआय तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. आरोग्य, शिक्षण, शेतीसह विविध क्षेत्रात एआय वापरून लोकांचे जीवन बदलण्यास मदत करू शकतो. एआय असे जग निर्माण करण्यास मदत करू शकते जिथे विकासाच्या उद्दिष्टांकडे प्रवास सोपा आणि जलद होईल. हे करण्यासाठी, आपल्याला संसाधने आणि प्रतिभा एकत्र आणल्या पाहिजेत. आपण विश्वास आणि पारदर्शकता वाढवणाऱ्या ओपन-सोर्स सिस्टम विकसित केल्या पाहिजेत. आपल्याला पक्षपातीपणापासून मुक्त असलेले दर्जेदार डेटा सेट तयार करण्याची आवश्यकता आहे.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, एआयचे भविष्य सर्वांसाठी चांगले आहे याची खात्री करण्यासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य सामायिक करण्यास तयार आहे. आमच्याकडे जगातलं सर्वात मोठं टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. आमचं सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करतं आहे. एआयचे भविष्य चांगलं असून यामुळे सगळ्यांचं हित होणार आहे. भारताने आपल्या १.४ अब्जाहून अधिक लोकांसाठी अतिशय कमी खर्चात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यशस्वीरित्या निर्माण केल्या आहेत. भारत एआयचा अवलंब करण्यात आणि डेटा गोपनीयतेसाठी तांत्रिक-कायदेशीर पाया तयार करण्यातही आघाडीवर आहे.
हे ही वाचा :
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी
निलेश राणेंनी इशारा देताच, पोलिसांनी मुस्लिमाची अनधिकृत चहाची टपरी हटवली!
राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक!
मुंबई हल्ल्यासारख्या पाकिस्तानने दिलेल्या जखमा विसरता येणार नाहीत
एआय आधीच आपली अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि अगदी आपल्या समाजालाही आकार देत आहे. या शतकात एआय मानवतेसाठी कोड लिहित आहे. यामुळे लाखो आयुष्यं बदलणार आहेत. एआयने सायबर गुन्हेगारी संदर्भातील धोके निर्माण झाले आहेत. तसेच फेक न्यूज आणि इतरही धोके दिसत आहेत. सायबर सिक्युरिटी, डीपफेक असे धोके आहेतच त्यासाठी एक नीती ठरवण्याची गरज आहे. सायबर सुरक्षा, चुकीची माहिती आणि डीप फेकशी संबंधित चिंता देखील दूर केल्या पाहिजेत. काळ बदलतो आहे त्याचप्रमाणे रोजगारांचे स्वरुपही बदलतं आहे. एआयमुळे रोजगाराचे संकट निर्माण होण्याची भीती असली तरी इतिहास आपल्याला हेच सांगतो की कुठलंही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही. एआयमुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.