महेंद्रसिंग धोनी नेहमीच त्याच्या उत्कृष्ट कर्णधार, फलंदाजी आणि मैदानावर यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो. पण आता भारताच्या माजी कर्णधाराने नवा अवतार धारण केला आहे. हा त्याचा सुपरहिरोचा अवतार आहे ज्यामध्ये तो अगदी वेगळा दिसतो. कॅप्टन कूलने काल फेसबुकवर त्याच्या ग्राफिक कादंबरीचा ‘ ‘अथर्व’ चा टीझर रिलीज केला आहे.
या टीझर व्हिडिओमध्ये एमएस धोनी एका फायटरच्या लूकमध्ये दिसत आहे. या ग्राफिक कादंबरीची निर्मिती धोनीची स्वतःची मनोरंजन कंपनी करत आहे. ही कादंबरी लेखक रमेश थमिलमणी यांनी लिहिली आहे. यामध्ये धोनी एका अघोरीच्या भूमिकेत दिसत आहे.
एमएस धोनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो अँनिमेटेड योद्धा दिसत आहे. त्यांची ग्राफिक कादंबरी एका पौराणिक वैज्ञानिक कथेवर आधारित आहे. त्याचे पूर्ण नाव ‘अथर्व द ओरिजिन’ आहे. धोनीचा ह्या नव्या अवताराला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.
फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत धोनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझा नवीन अवतार अथर्वची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे.’ याआधी त्याची पत्नी साक्षी धोनीने या ग्राफिक नॉव्हेलच्या निर्मितीबद्दल सांगितले होते की, ‘ही कादंबरी एका पौराणिक कथेवर आधारित आहे ज्याचा विज्ञानाशीही संबंध आहे. उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या एखाद्या ठिकाणी कैद झालेल्या रहस्यमय अघोरीचा प्रवास यामध्ये आहे.
हे ही वाचा:
अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!
नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
शिंदे स्पोर्ट्स, शरद पवार, सुधीर फडके आणि…
धोनी आणि साक्षीने ‘धोनी एंटरटेनमेंट’ ही कंपनी स्थापन केली होती. त्यांनी २०१९ मध्ये डिस्ने + हॉटस्टारसाठी ‘द रोअर ऑफ द लायन’ हा त्यांचा पहिला प्रकल्प देखील तयार केला होता. यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.