25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरदेश दुनियाटीम इंडियाची आज अस्तित्वाची लढाई

टीम इंडियाची आज अस्तित्वाची लढाई

Google News Follow

Related

आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषकात आज भारतीय संघाचा आज अफगाणिस्तान सोबत सामना रंगणार आहे. भारतासाठी हा सामना म्हणजे अस्तित्वाची लढाई असणार आहे. कारण स्पर्धेत किमान पुढल्या फेरीत जाण्याची धूसर शक्यता जिवंत ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे भारतीय संघासाठी क्रमप्राप्त आहे. त्यामुळे भारत आजच्या सामन्यात विजयी सुरुवात करतो का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

दुबई येथे सुरु असलेल्या आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषकात भारताला अजून विजयी सूर गवसला नाहीये. भारताने पाकिस्तान आणि न्यूझीलंड सोबतचे आपले पहिले दोन्ही सामने मोठ्या फरकाने गमावले आहेत. भारताला पाकिस्तानने १० गडी राखत हरवले असून न्यूझीलंडनेही भारताचा ८ गडी राखून धुव्वा उडवला होता. या दोन्ही पराभवांमुळे भारताचे आयसीसी टी२० विश्वचषकातील प्रवास खडतर झाला आहे.

हे ही वाचा:

‘…अन्यथा आत्मदहन करू’ ! शिक्षकांचा ठाकरे सरकारला इशारा

ग्लास्गोमध्येही पंतप्रधान मोदींचे कलम ३७० हटवण्यासाठी कौतुक

फडके रोड राहणार सुना सुना, जमावबंदी लागू

 

भारताला आता सुपर १२ फेरीतील आपले सर्व सामन जिंकावे लागणार आहेत. पण नुसते सामने जिंकून भारताला चालणार नाही तर हे सामने मोठ्या फरकाने जिंकून धावगतीही सुधारावी लागणार आहे. तसे झाले तरच भारताच्या या विश्वचषकात उपांत्य फेरीत जाण्याच्या अशा जिवंत राहणार आहेत. त्यामुळे भारताला आजचा अफगाणिस्तान सोबतच सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात विराट कोहलीची टीम इंडिया विजयासाठी नेमकी काय रणनीती वापरणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. संघ निवडीत भारतीय संघ काही बदल करतो का? हे बघणेही महत्वाचे ठरणार आहे.

पण भारत या पुढचे सर्व सामने जिंकला तरीही भारताचे उपांत्य फेरीत दाखल होणे हे आता पूर्णपणे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघांच्या सामन्यावर अवलंबून आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा