तस्लीमा नसरीन या बांगलादेशी लेखिका सातत्याने बांगलादेशातील मानवी हक्कांच्या पायमल्लीबाबत बोलत असतात. आता त्यांनी एक छायाचित्र शेअर करत बांगलादेशात कसा भारतद्वेष पसरवला जात आहे, याचा एक नमुना पेश केला आहे.
बांगलादेशात पूर आलेला असताना पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीचे छायाचित्र नसरीन यांनी शेअर केले आहे. ते शेअर करताना त्या व्यक्तीच्या पाठीवर लिहिलेल्या मजकुराकडे त्या लक्ष वेधतात. त्यात बांगला भाषेत म्हटले आहे की, तुमच्या मुलाला भारतविरोधी बनवा.
बांगलादेशात आलेल्या पुरादरम्यान हे छायाचित्र काढलेले आहे. अनेकांनी ते शेअर केले असून ते सत्य असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशात जो पूर आला तो भारताने सोडलेल्या पाण्यामुळे आला असा खोटा प्रचार यादरम्यान करण्यात आला. त्यामुळे बांगलादेशातील लोकांमध्ये एक द्वेषाचे वातावरण तयार झाले आहे.
हे ही वाचा:
‘मी हिंदूंचा गब्बर, बघून लोकं दारं-खिडक्या बंद करतात’
ममता दीदी भेट देईनात, टीएमसी प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा
गाझामधील बोगद्यात सहा ओलिसांचे मृतदेह सापडले
पॅरालिम्पिक: भारतीय नेमबाजांची चमक कायम, रुबिनाने कांस्यपदक जिंकले !
मध्यंतरी बांगलादेशातील एका व्यक्तीने याच अपप्रचारामुळे हिंदूंच्या मंदिरांवर हल्ला केला होता. नंतर त्याला पकडण्यात आले. नसरीन यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, बांगलादेशातील जमाते इस्लामी ही संघटना गरीबांना अशा पद्धतीचे टीशर्ट वापरू देत आहे. ज्या माध्यमातून भारताचा द्वेष करण्यास त्यांना सांगितले जात आहे. भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्यास सांगितले जात आहे. भारतविरोधी इस्लामींची संख्या बांगलादेशात वाढू लागली आहे.
बांगलादेशातील ब्लॉगर असद्दुझमान नूर यानेही हे छायाचित्र खरे असल्याचे म्हटले आहे. या आरोपांचा भारताने स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. त्रिपुरातील डांबर हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पातून हे पाणी बांगलादेशात सोडण्यात आल्याचा आरोप होता.