व्यवसायाबाबत बोला; काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासाठी आलेलो नाही!

पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणाऱ्या बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकला सुनावले

व्यवसायाबाबत बोला; काश्मीर मुद्द्यावर बोलण्यासाठी आलेलो नाही!

पाकिस्तानकडून अनेकदा विनाकारण काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला जातो. अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासह अनेक देशांनी पाकिस्तानला काश्मीर मुद्द्यावरून फटकारले आहे. काश्मीरचा प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सुनावले आहे. तरीही पाकिस्तानकडून हट्ट सोडला जात नसून आता पुन्हा एकदा पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी यावर भाष्य करावे अशी अपेक्षा करणाऱ्या पाकिस्तानला बेलारूसने तोंडावर पाडले आहे.

बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे सोमवारी तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर इस्लामाबादला पोहोचले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी आर्थिक क्षेत्रासह अनेक क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा केली. अशातच प्रोटोकॉल मोडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांचे इस्लामाबादमध्ये स्वागत केले. लुकाशेन्को यांनी पाकिस्तान दौऱ्यावर असताना काश्मीर प्रश्नावर भारतविरोधी वक्तव्य करावे, अशी त्यांची इच्छा होती पण, अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानला स्वतःच्याचं देशात नाचक्की सहन करावी लागली.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अलेक्झांडर लुकाशेन्को यांची इस्लामाबादमध्ये भेट घेतली. पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी सांगितले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या वतीने अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासोबतच्या बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी काश्मीरवर कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. ते म्हणाले की, ते फक्त व्यवसायाबाबत बोलण्यासाठी आले आहेत आणि या संदर्भात बेलारूस आणि पाकिस्तानशी संबंध कसे सुधारता येतील यावरच ते बोलतील. काश्मीर किंवा अन्य कोणत्याही राजकीय मुद्द्यावर ते कोणतेही वक्तव्य करणार नाहीत.

हे ही वाचा : 

देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा, शिंदेंनी दिला पाठींबा

इस्कॉनवर बंदी घालण्याची बांगलादेश न्यायालयात मागणी

झारखंडमध्ये भाजपला मतदान केले म्हणून हिंसाचार

दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी जम्मूमध्ये एनएसजीचे पथक कायमस्वरूपी तैनात !

पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर या विषयावर मत मांडले आहे. काश्मीरचा मुद्दा प्रत्येक व्यासपीठावर मांडणे हा पाकिस्तानच्या राजकारणाचा आणि मुत्सद्देगिरीचा भाग बनला आहे परंतु. लुकाशेन्को यांच्या उत्तरावरून सर्वच देश या मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा देऊ शकत नाहीत, हे दिसून येते. शिवाय यामुळे पाकिस्तानचे हसे झाल्याच्याही चर्चा असल्याचे वृत्त आहे.

Exit mobile version