अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आता महिला वृत्त निवेदिकांवर बंदी घातली आहे. सरकारी न्यूज चॅनलच्या एका महिला वृत्त निवेदिकेला तालिबान्यांनी नोकरीवरुन काढून टाकलं आहे. कालच तालिबानने एका महिला वृत्त निवेदिकेला मुलाखत दिल्याची बातमी समोर आली होती, परंतु आज तालिबानने खरे रंग दाखवत महिलांना पुन्हा एकदा महिला वृत्त निवेदिकांवर बंदी आणली आहे.
आता तालिबानी अँकर्स टीव्हीवर बातम्या देताना दिसून येणार आहेत. खदीजा अमीना नावाची ही महिला सरकारी न्यूज चॅनलमध्ये वृत्त निवेदिका म्हणून काम करत होती. तिला तालिबान्यांनी कामावरुन काढून टाकलं. एका दिवसापूर्वीच तालिबान्यांनी म्हटलं होतं की, आमच्या राज्यात महिलांच्या हिताचं रक्षण होईल. परंतु, आता तालिबानी म्हणतायत की, देशात केवळ शरीयत कायद्याअंतर्गत महिलांना काम करण्याची परवानगी आहे.
नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर अफगाण न्यूज अँकर अदीजा अमीना म्हणाली की, “मी काय करु? पुढच्या पीढीकडे काहीच काम नसेल. २० वर्षांत जे काही मिळवल, ते सर्व निघून जाईल. तालिबान तालिबान आहे, ते बदललेले नाहीत.”
एका दिवसापूर्वी तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी प्रेस कॉन्फरन्सदरम्यान म्हटलं की, आता अफगाणिस्तान मुक्त करण्यात आलं आहे. गेल्या सरकारनं महिलांवर अनेक निर्बंध लादले होते. पण आता तालिबान्यांच्या शासनकाळात महिलांसोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात येणार नाही. मुजाहिदनं दिलेल्या माहितीनुसार, महिलांना इस्लामी कायद्याच्या मानदंडांचं पालन करुन अधिकार दिले जातील. महिलांना आरोग्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येईल.
हे ही वाचा:
काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?
पोलीस महासंचालकांचेच बनवले बनावट फेसबुक अकाऊंट
विवेक पाटीलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त
आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?
दरम्यान, २० वर्षांपूर्वी तालिबानच्या शासन काळात अफगाणिस्तानातील महिलांना चार भिंतींमध्ये समित करण्यात आलं होतं. तेव्हाही महिलांचं जीवन आणि अधिकारांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या सत्तेत तालिबान्यांची वापसी झाली आहे. अशातच सर्वात मोठी समस्या अफगाणी महिला आणि अधिकाऱ्यांची सुरक्षा ही आहे.