रशियामध्ये तालिबानची नांदी?

रशियामध्ये तालिबानची नांदी?

रशियातील विद्यापीठात दहशतवाद्यांचा गोळीबार

रशियाच्या एका विद्यापीठात एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात अंदाजे ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मॉस्कोपासून १३०० किलोमीटरवर असणाऱ्या पर्म स्टेट यूनिव्हर्सिटीत हा गोळीबार झाला. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थी विद्यापीठाच्या इमारतीच्या टेरसवर तर काही विद्यापीठांच्या सभागृहात लपले. हेच नाही तर जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडकीतून उड्या मारल्या. रशिया टुडे या स्थानिक माध्यम समुहाच्या माहितीनुसार या हल्ल्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६ जण जखमी झाले आहेत.

रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सनकी शूटर १८ वर्षांचा तिमुर बेकमानसुरोव आहे. ज्याला सुरक्षा रक्षकांनी गोळी मारली आणि त्याचाही जागेवरच मृत्यू झाला. रशियाच्या वेळेनुसार सकाळी ११ वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला. अजून एका क्लिपमध्ये एक व्यक्ती शस्र घेऊन पर्म विद्यापीठात चालताना दिसतो आहे.

जेव्हा हल्ला झाला, त्यानंतर लगेच सोशल मीडियावर हल्ल्याचे व्हिडीओ आले, आणि परिसरातील लोकांना लपण्यास सांगण्यात आलं. अनेकांनी हे व्हिडीओ पाहून या परिसरात जाणं टाळलं, तर विद्यापीठात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत:ला रुममध्ये बंद करुन घेतलं.

हे ही वाचा:

आयएसआयएस-तालिबानमध्येच जुंपली

रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा

गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० ​कोटींचा घोटाळा केला

आज होणार हसन मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड

दरम्यान, हल्ला झाल्याची माहिती मिळताच, विद्यार्थ्यांनी वर्गाच्या खिडक्यातून बाहेर उड्या मारणं पसंत केलं. नशीबाने इमारत जास्त उंच नसल्याने कुणाला काही झालं नाही. मात्र शेकडो विद्यार्थी खिडक्यांतून इमारतीच्या बाहेर पडले. विद्यार्थी विद्यापीठाच्या इमारतीतून बाहेर पडतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Exit mobile version