31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरदेश दुनियातालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

तालिबानने कब्जा केल्यामुळे भारतातला सुकामेवा महाग होणार?

Google News Follow

Related

अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर पूर्वीचे निर्णय आणि धोरणे यामध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. तालिबानने भारताविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार आता अफगाणिस्तानात भारताला व्यापारी आणि आयात-निर्यातीसाठी बंदी घालण्यात आली आहे.

भारतीय निर्यात संघटनेचे संचालक डॉ. अजय सहाय यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तालिबानने व्यापारी मालाची वाहतूक बंद केली आहे. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमार्गे मालाची ये-जा होत असे. मात्र, आता तालिबान्यांनी हाच मार्ग रोखून धरल्यामुळे अफगाणिस्तानमधील आयात-निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. भविष्यात तालिबानी प्रशासक काय निर्णय घेतात, याकडे आमचे लक्ष राहील, असे अजय सहाय यांनी सांगितले.

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये अत्यंत चांगले व्यापारी संबंध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अफगाणिस्तानमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, आता तालिबानच्या सत्तेनंतर ही सर्व समीकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याविषयी विचारले असता त्यांनीही इतक्यात याबाबत बोलणे घाईचे ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात २०२१ मध्ये आतापर्यंत चांगला व्यापार झाला आहे. या कालावधीत भारताने अफगाणिस्तानात ८३५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर अफगाणिस्तानमधून ५१० कोटी डॉलर्स मुल्याच्या वस्तू आयात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अफगाणिस्तानमध्ये भारताने तब्बल ४०० प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा हा आकडा तब्बल २२ हजार कोटी रुपयांच्या घरात जातो.

हे ही वाचा:

शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण

काश्मिरला बसला भूकंपाचा धक्का

राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी

आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा

भारत अफगाणिस्तानमध्ये साखर, औषधे, चहा, कॉफी, मसाले आणि कापड अशा गोष्टींची निर्यात करतो. तर अफगाणिस्तानमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने सुकामेव्याचा समावेश आहे. भारतात होणाऱ्या सुकामेव्याच्या एकूण आयातीपैकी ८५ टक्के हिस्सा अफगाणिस्तानमधून आयात केला जातो. ही गोष्ट लक्षात घेऊन तालिबानी शासकांनी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयात-निर्यात सुरु ठेवली पाहिजे, असे मत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे संचालक अजय सहाय यांनी व्यक्त केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा