महिलांना बुरखा घालण्यावर तालिबानच्या न्याय मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

तालिबानने २०२२ मध्येचं दिले होते आदेश आता कायद्यात रुपांतर

महिलांना बुरखा घालण्यावर तालिबानच्या न्याय मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब

अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यानंतर तेथील तालिबान्यांनी सत्तेवर कब्जा केल्यापासून ते देशात शरिया कायदा लागू करत आहेत. सत्तेत येताच जाचक कायदे लागू होणार नाहीत, महिलांवर बंधने लादणार नाहीत, अशी आश्वासने तालिबानी सरकारने दिली होती. मात्र, कालांतराने त्यांनी शरिया कायदा लागू करण्यास सुरुवात केली. महिलांवर जाचक नियम लादण्यात आले आहेत.

अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी बुरखा अनिवार्य असल्याचा आदेश यापूर्वीच दिला आहे. तसेच पुरुषांनी दाढी वाढवणे, कार चालकांनी गाणी वाजवू नयेत असे निर्बंध घालण्यात आले असून या सर्व निर्बंधांवर आता तालिबान प्रशासनाच्या न्याय मंत्रालयाने औपचारिकपणे शिकामोर्तब केले आहे. न्याय मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, तालिबानच्या सर्वोच्च आध्यात्मिक नेत्याने २०२२ मध्ये आदेश जारी करून हे नियम लागू केले होते. हे नियम आता अधिकृतपणे कायदा म्हणून प्रकाशित झाले आहेत.

तालिबानच्या महिलांवरील निर्बंध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक अधिकार गट आणि परदेशी सरकारांनी तीव्र टीका केली आहे. न्यूज आउटलेट न्यू अरबच्या वृत्तानुसार, काबूलमधील रहिवासी असलेल्या महिलेने सांगितले की, महिलांना समाजातून पुसून टाकण्याचे दररोज प्रयत्न केले जात आहेत. ते म्हणाले की तालिबानच्या नियमांबाबत जगाचे मौन त्यांना दररोज नवीन निर्बंध लादण्यास प्रोत्साहित करत आहे.

हे ही वाचा:

मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !

पंतप्रधान मोदी, योगींचे कौतुक केल्यामुळे मुस्लीम महिलेला पतीकडून ‘तिहेरी तलाक’

नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

आसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू

तालिबानचे म्हणणे आहे की, ते स्थानिक प्रथा आणि इस्लामिक कायद्याच्या व्याख्यानुसार महिलांच्या हक्कांचा आदर करतात. नियमांनुसार, महिलांनी त्यांचे शरीर आणि चेहरा पूर्णपणे झाकणारा ड्रेस घालणे आवश्यक आहे. याशिवाय पुरुषांना दाढी वाढवावी लागते आणि ती कापू शकत नाही. नियम न पाळल्यास शिक्षाही आहे. २०२१ मध्ये अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. सत्तेवर आल्यानंतर तालिबानने पूर्वीचे संविधान निलंबित केले आणि ते शरिया कायद्यानुसार देशावर राज्य करतील असे सांगितले.

Exit mobile version