तालिबानी शाहिद आफ्रिदी?

तालिबानी शाहिद आफ्रिदी?

तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने त्याची प्रतिक्रिया देताना एक वेगळचं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेक अफगाणि नागरिकांची मनं दुखावली गेली आहेत.

आफ्रिदीने तालिबान्यांच्या बाजूने बोलताना म्हटलं आहे की, ‘तालिबानी यावेळी सकारात्मक पद्धतीने समोर आले आहेत. कारण त्यांनी महिलांना राजकारणात आणि नोकरीनिमित्त बाहेर पडण्याची परवानगीही दिली आहे.” तसंच अफगाणिस्तान क्रिकेटबद्दल शाहिद म्हणाला, ”तालिबान यावेळी क्रिकेटला पूर्ण पाठिंबा देत आहे. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे तो दौरा रद्द झाला असला तरी तालिबान क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा देत आहे.” आफ्रिदीच्या या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून  आफ्रिदीवर टीका केली जात आहे. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये आणि जनतेमध्ये कट्टर इस्लामिक मानसिकता किती खोलवर रोवली गेली आहे, याचं हे द्योतक आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यानेही यापूर्वी तालिबानचे समर्थन केले होते.

हे ही वाचा:

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू मागील अनेक दिवस या प्रकरणावर वक्तव्य करत आहे. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या सर्व परिस्थितीमुळे तणावाखाली असणाऱ्या राशिदने त्याच्या इन्स्टास्टोरीतून आपल्या भावनाही व्यक्त केल्या. त्याने रडण्याचे इमोजी टाकत मी नीट झोपूही शकत नाही असं लिहिलं होतं. दरम्यान आता या सर्वावर शाहिदने दिलेल्या या वक्तव्यावर राशिद काही प्रतिक्रिया देतो का? हे पाहावं लागेल.

Exit mobile version