गाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार

गाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार

अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट होऊन तालिबानचे सरकार आल्यापासून तालिबान्यांच्या क्रूर कृत्याचे दर्शन नेहमीच घडत राहिले आहे. तालिबानचा क्रूरपणा आता पुन्हा एकदा समोर आला आहे. केवळ गाणी वाजवल्यामुळे तालिबान्यांनी १३ लोकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तालिबानच्या नांगरहार प्रांतात लग्नाच्या कार्यक्रमावेळी गाणी लावल्याने तालिबान्यांनी १३ निरपराध लोकांचा बळी घेतला आहे. तालिबानच्या या क्रूर कृत्याचा खुलासा माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी ट्विट करत केला आहे.

हे ही वाचा:

पुण्यात स्लॅब कोसळला; १२ जखमी

चीनचे ‘काळे’ कारस्थान; अनेक मासे मृत

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

‘नांगरहारमध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमात गाणी बंद करण्यासाठी म्हणून तालिबानी सैनिकांनी १३ जणांची हत्या केली. केवळ निंदा करून आपण आपला राग व्यक्त करू शकत नाही. २५ वर्षे पाकिस्तानने त्यांना अफगाण संस्कृती नष्ट करण्याचे प्रशिक्षण दिले आहे आणि आमच्या मातीवर कब्जा करून कट्टर आयएसआयची राजवट प्रस्थापित केली. जे आता त्यांचे काम करत आहेत’, असे अमरुल्ला सालेह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यावर संपूर्ण जगाला सांगितले होते की, ते सर्वांना समान हक्क आणि अधिकार देतील. मात्र, फार काळ ते त्यांच्या शब्दांवर टिकून राहिले नाहीत. महिलांना, मुलींना अजूनही काही भागांमध्ये शिक्षणाला बंदी आहे. सरकारी कामांमध्ये त्यांना स्थान दिलेले नाही. विनाकारण नागरिकांच्या हत्या केल्या जात आहेत.

Exit mobile version