तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

आयआयएम कोझीकोड  देणार ऑनलाईन व्यवस्थापन प्रशिक्षण

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संस्थेतर्फे तालिबानमधल्या राजकीय व्यक्तींना प्रशिक्षण देण्यांत येणार आहे. यासाठी खास एक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून तो ऑन लाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. यासंदर्भात भारत आणि अफगाणिस्तान मध्ये याबाबत एका कारवार स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या अभ्यासक्रमावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जगभरातल्या एखाद दुसरा देश सोडता कोणत्याच देशाने अफगणिस्तानातील तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाही. सध्या तालिबानच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून तालिबानी साठी एखादा अभ्यासक्रम सुरु करणे कितपत योग्य असल्याची चर्चा सुरु आहे.

भारत आणि तालिबान या देशांमध्ये या ” इमरसिंग वित इंडियन थॉट्स ” या ऑन लाईन अभ्यासक्रमावर स्वाक्षऱ्या झाल्या असून आयआयएम कोझीकोड या केंद्रसरकारच्या संस्थेमार्फत त्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवणार आहेत. तालिबानचा राजदूत आणि राजकीय कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. भारतीय दूतावासाने काबुल इथल्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जागतिक स्तरावरील उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी हा अभ्यासक्रमाचा करार केला जात असल्याचे या करारामध्ये म्हंटले आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंच्या मशालीतला आणखी एक निखारा निघाला…दीपक सावंत एकनाथ शिंदेंकडे

‘राम- सीता’ ३५ वर्षानंतर पुन्हा आले एकत्र…

राहुल गांधी आज येणार संसदेत, लंडनमधील भाषणाबद्दल बोलणार का?

तुषार मेहतांनी नेमके काय सुचवले?

या करारामध्ये तालिबान मधील राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी प्रशिक्षण घेणार असून सर्वाना काबुल इथल्या अफगाण इन्स्टिटयूट ऑफ डिप्लोमेसि येथे हे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  आयआयएम कोझिकोड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हण्टले आहे कि, या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना भारतातले व्यावसायिक वातावरण , रेग्युलेटरी इकोसिस्टम बद्दल माहिती, सांस्कृतिक वारसा आणि त्याबद्दल माहिती मिळेल. या आपत्कालीन प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता उद्या १७ तारखेला होणार आहे.

Exit mobile version