कर्नाटक मधील हिजाब वाद हा दिवसेंदिवस जास्तच मोठा होताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच या विषयाला भारताबाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत होता. हिजाबसाठी अडून बसलेल्या मुस्लीम महिलांच्या समर्थनार्थ पाकिस्तान मधून समर्थन प्राप्त होताना दिसत होते. ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांमधून या संबंधीच्या पोस्ट पाकिस्तानी नेते करत होते. तर आता थेट तालिबान कडूनही या मुलींना पाठिंबा दर्शवला जात आहे. या मुली इस्लामच्या मूल्यांसाठी उभ्या राहिल्याचे म्हणत तालिबानने त्यांचे कौतुक केले आहे.
हिजबसाठी भारतीय मुस्लिम मुलींचा चालू असलेला लढा हे दाखवते की हा फक्त इराणी, इजिप्शियन किंवा पाकिस्तानी संस्कृतीचा भाग नसून इस्लामिक मूल्ये आहेत. यासाठी जगभरातील मुस्लिम मुलींना संघर्ष करावा लागतो जेणेकरून त्यांचा हा धार्मिक अधिकार जतन होईल. तालिबान प्रणित अफगाणी सरकारचे प्रवक्ते असलेल्या इनामुल्लाहा समांगानी यांनी असे ट्विट करत म्हटले आहे.
हे ही वाचा:
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
लता दीदींच्या स्मारकावरून राजकारण नको, मंगेशकर कुटुंबियांचे आवाहन
भारत वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देणार?
पुढे ते म्हणतात की त्यांच्या मते हिजाब हे पहिले प्राधान्य आहे आणि शिक्षणाला दुय्यम स्थान आहे. मुस्लिम महिला आपल्या धार्मिक मूल्यांसाठी भूमिका घेत आहेत आणि या धर्मनिरपेक्ष जगात त्याचा बचाव करण्यासाठी विविध प्रकारचा त्याग करत आहेत हे पाहून आनंद होतो असेही ते म्हणाले.
दरम्यान या सर्व वादात कर्नाटक उच्च नयायल्याने अंतरिम आदेश दिला असून न्यायालयाचा निकाल येई पर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पेहराव करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात नेमका काय निकाल देणार याकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे.