अफगाणिस्तानसमोरच्या चिंतेत आता मोठी वाढ झाली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुल देखील आता तालिबानच्या ताब्यात गेली आहे. तालिबानने काबुलची नाकाबंदी करायला सुरूवात केली आहे.
आजच तालिबनने जलालाबादवर ताबा मिळवला होता. त्यानंतर काबुलला असलेला धोका स्पष्ट झाला होता. अफगाणिस्तानातील परिस्थितीत चिघळत असतानाच काबुलच्या विविध भागातून तालिबानने काबुलमध्ये शिरायला सुरूवात केली आहे. काबुल तालिबानच्या हातात पूर्णपणे गेल्यास अफगाणिस्तानावर तालिबानचा ताबा प्रस्थापित व्हायला वेळ लागणार नाही.
तालिबानने काबुलवर ताबा मिळवण्यास सुरूवात केल्यानंतर जागतिक हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घानी यांनी दिलेल्या माहितीनुसार काबुलमधील परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. शहरातील वेगवेगळ्या भागातून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येत आहेत.
हे ही वाचा:
एसटीचे कर्मचारीही थकले आणि त्यांचे वेतनही
…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
तालिबानने घानी सरकारला शांततापूर्ण वाटाघाटींसाठी आवाहन केले आहे. त्याबरोबरच सामान्य नागरिकांना मारण्याची इच्छा नसल्याचे देखील त्यांनी सांगितले असले तरीही, अजूनही युद्धविरामाची घोषणा केलेली नाही. तालिबानने नागरिकांना घाबरून जाऊन घर सोडू नये असे सांगितले आहे. तालिबानने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार काबुलमधील नागरीकांचे आयुष्य सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्याबरोबरच रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलवली आहे, तर ब्रिटनने पुन्हा एकदा संसदेचे अधिवेशन बोलावले आहे. प्रागने सैनिकी विमान पाठवून आपल्या सर्व अधिकाऱ्यांना परत बोलावून घेण्याची तयारी चालू केली आहे.
अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान संघटना पुन्हा सक्रिय झाली असून अफगाणिस्तानच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिणकडील प्रांत त्यांनी तीन आठवड्यात हस्तगत केले आहेत. अमेरिकेने मे महिन्यापासून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास प्रारंभ केला. हळूहळू अमेरिकी सैनिक मायदेशी परतु लागले आणि तालिबानच्या कारवाया वाढू लागल्या. गेल्या महिनाभरात तालिबानने वेगाने हालचाली केल्या. त्यातूनच आजपर्यंत ३४ पैकी ३० प्रांतावर त्यांनी ताबा मिळविला आहे.