तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने घरोघरी जाऊन लोकांची हत्या करायला सुरवात केली आहे. शोधून शोधून पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी तालिबानचा दहशतवादी काबूलमध्ये फिरत आहेत. कालच डीडब्ल्यू न्यूज नावाच्या एका जर्मन वृत्तवाहिनीच्या एक पत्रकाराला गंभीर इजा पोचवली तर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्याही केली. त्याव्यतिरिक्त अजून एका नातेवाईकाला गंभीर दुखापती झाली. या घटनेनंतर या पत्रकाराने जर्मनीला पलायन केले. त्याचबरोबर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील व्यक्तींनीही जर्मनीत यशस्वीपणे पलायन केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर तालिबानच्या अनेक अनन्वित छळांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हिंदू, शीख यांच्यासारखे अल्पसंख्यांक तसेच महिला आणि मुलांना सर्वाधिक जाच सहन करावा लागत आहे. यामुळे अफगाण महिला आपल्या मुलांना वाचवण्यासाठी काय टोकाची पावलं उचलावी लागत आहेत, हे पाहून कोणत्याही सहृदय व्यक्तीला नक्कीच वेदना होतील.
हे ही वाचा:
….आणि राज्यात पुन्हा उडाला बैलगाडा शर्यतीचा धुरळा
सैफ-अर्जूनच्या ‘भूत पोलिस’ चा ट्रेलर प्रदर्शित
प्रदूषणमुक्तीच्या नव्या प्रकल्पाला पालिकेची ‘मिठी’
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे
भारतीय नागरिकांना काबुल विमानतळावर सोडण्यासाठी हातात मशीन गन आणि रॉकेट लॉन्चर घेऊन तालिबानने सुरक्षा पुरवली. काल रात्री १२ वाजता १५० भारतीय नागरिकांना काबुल मधून भारतात आणण्यात आले. यावेळी तालिबानने विमानतळाजवळ गाडयांमधून उतरून गर्दीला पांगवण्यासाठी गर्दीवर बंदुका रोखल्या आणि भारतीय नागरिकांना काबुल विमानतळात जाण्याचा मार्ग मोकळा केला.
तालिबानने बामियानमधील गौतम बौद्धाचा पुतळा उडवून दिल्याची घटना आपल्याला सर्वांना माहिती आहेच. परंतु आता त्याच बामियानमध्ये अफगाणिस्तानने हजारा समाजातील एका नेत्याचा पुतळा उध्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे. अब्दुल अली माझारी या हजारा समाजातील नेत्याची तालिबानने १९९५ साली हत्या केली होती. २००१ साली तालिबानची सत्ता गेल्यानंतर हजारा समाजाने त्यांच्या या नेत्याचा पुतळा बांधला होता.