25 C
Mumbai
Friday, January 17, 2025
घरदेश दुनियातालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याच्या उंबरठ्यावर

तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा करण्याच्या उंबरठ्यावर

Google News Follow

Related

भारताने अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवू नये, ते भारताच्या हिताचे राहणार नाही. असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. तालिबानचे प्रवक्ते मुहम्मद सुहेल शाहीन यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली.

अफगाणिस्तान मागील अनेक दशकांपासून अशांत देश म्हणूनच ओळखला जातोय. या देशातील सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्या कायमच्याच युद्धजन्य परिस्थितीमुळे होरपळून निघालं आहे. त्यामुळे मुलभूत गरजांचाही तुटवडा निर्माण झालाय. याची कारणं इतिहासात आहेत. जगातील प्रत्येक महासत्तेने अफगाणिस्तानवर नियंत्रणाचा प्रयत्न केला आणि या महासत्तांचा सपशेल पराभव झाला. याची सुरुवात अगदी जगजेत्या सिकंदर महानपासून झाली. एका वर्षात जगाचा मोठा भूभाग जिंकणाऱ्या सिकंदरला त्या तुलनेत लहान अफगाणिस्तान जिंकायला तब्बल ३ वर्षांपेक्षा अधिक काळ लागला. मात्र, जिंकूनही त्यांना फार काळा अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवता आलंच नाही. हाच अनुभव अगदी ज्यांचा सूर्य कधीच मावळला नाही अशा ब्रिटिशांनाही आला.

नंतरच्या काळात जगाची महासत्ता म्हटल्या जाणाऱ्या तत्कालीन सोव्हिएत युनियनने देखील सैन्य कारवाई करत अफगाणिस्तानवर राज्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तसं फार काळ करणं शक्य झालं नाही. अखेर सोव्हिएत युनियनला माघार घ्यावी लागली. त्यानंतर सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि रशियाची निर्मिती झाली.

यानंतर अफगाणिस्तानला मिळणारी रशियाची पूर्ण मदत बंद झाली आणि तालिबानने अफगाणवर पूर्ण कब्जा केला. याच काळात या देशात शरिया कायदा लागू करण्यात आला. यामुळे स्त्रीयांवर जबर निर्बंध लादण्यात आले. स्त्रीयांचं काम बंद करण्यात आलं, बुरखा बंधनकारक केला आणि पुरुषाशिवाय घराबाहेर पडणंही बंद केलं. तालिबानने १९९६ ते २००१ या काळात संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवलं.

हे ही वाचा:

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग ठरला

मुंबई महापालिकेत बदल्या, बढत्यांमध्ये घोटाळा?

ट्विटर इंडिया प्रमुखांची उचलबांगडी

कंदहार पडले, तालिबानची राजवट अटळ?

दरम्यान, अफगाणिस्तानमधील कट्टरवादी गट अल-कायदाने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ९/११ चा हल्ला केला आणि यात अमेरिकेनेही उडी घेतली. अमेरिकेने अल-कायदाला धडा शिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवलं. यानंतर अमेरिकन सैन्याने तालिबानला राजधानी काबूलमधून हाकललं, मात्र, मागील ३० वर्षे प्रयत्न करुनही अमेरिकेला तालिबानचा पूर्ण नायनाट करता आला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. तालीबानच्या प्रवक्त्याचे म्हणने बरोबर आहे, भारतानं सैन्य पाठवून काहीही साध्य होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा