नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

नसीब फळफळले! तालिबानींमध्ये सापडला समज असलेला एकमेव माणूस

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) सोमवारी (२० सप्टेंबर) जाहीर केले की, नसीब खान यांची एसीबीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली आहे. एप्रिल २०२१ मध्ये या पदावर नियुक्ती झालेल्या हामिद शिनवारी यांची जागा खान घेतील. नसीब खान यांना क्रिकेटची समज आहे आणि त्यांच्याकडे मास्टर्सची पदवी आहे या कारणास्तव त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एसीबीच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “बोर्डाचे अध्यक्ष अझीउल्लाह यांनी नसीब खान यांना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) नवीन सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी असून त्यांना क्रिकेटचे ज्ञान देखील आहे.”

तालिबानचे नवे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे धाकटे बंधू अनस हक्कानी यांनी हामिद शिनवारी यांची हकालपट्टी केली आहे. क्रिकेट बोर्डावर झालेल्या या बदलाविषयी हामिद म्हणाले की, त्यांना काढून टाकण्याचे कोणतेही कारण दिले गेले नाही, परंतु नसीबुल्लाह हक्कानी त्यांची जागा घेतील, असे त्यांना सांगण्यात आले.

हे ही वाचा:

हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द

१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावा

एसीबीचे अध्यक्ष अझीउल्लाह फाजली यांनी, “क्रिकेटची चांगली समज असणारा कोणी आमच्यात सामील झाला याचा आम्हाला आनंद आहे. बोर्डाशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांची मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.” असे सांगितले.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी खेळाडूंना तयारीसाठी सर्व आवश्यक सुविधांचे आश्वासन नसीब खान यांनी दिले होते. अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने एक फर्मान जारी केले होते. त्यांच्या या आदेशानुसार महिला क्रिकेट आणि इतर कोणत्याही खेळात भाग घेणार नाहीत. त्यांच्या या निर्णयाविरोधात जगभरातील अनेक देशांनी त्यांच्यावर टीका केली होती.

Exit mobile version