तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

तालिबानचे दारू’बॅन’; कालव्यात ओतले हजारो लीटर मद्य

अफगाणिस्तानमध्ये सत्ता पालट झाल्यावर तालिबानने इस्लामिक कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रविवारी २ जानेवारी रोजी तालिबानच्या गुप्तचर दलाने काबूलमध्ये कारवाई करत हजारो लिटर दारू जप्त केली. त्यानंतर ही दारू एका कालव्यात ओतण्यात आल्याचा व्हिडीओ तालिबानच्या गुप्तचर महासंचालनालयाने (GDI) शेअर केला आहे. तालिबानने अफगाण मुस्लिमांना दारूचे उत्पादन आणि विक्री थांबवण्याचा इशाराही दिला आहे.

तालिबानच्या गुप्तचर महासंचालनालयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचे कर्मचारी काबूलमधील छाप्या दरम्यान एका कालव्यात दारूचे बॅरल ओतत असताना दिसत आहेत. रविवारी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की, मुस्लिमांनी दारू बनवण्याच्या आणि विक्रीच्या व्यवसायापासून दूर राहावे.

या कारवाई दरम्यान तीन डीलर्सना अटक करण्यात आल्याचा दावा तालिबानच्या गुप्तचर संस्थेने केला आहे. या लोकांवर इस्लामिक कायद्यानुसार खटला चालवला जाईल आणि शिक्षा निश्चित केली जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र, ही कारवाई कधी करण्यात आली किंवा ही दारू कधी नष्ट करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा:

मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात इस्लामी शिकवण

मुस्लीम महिलांचा लिलाव करणाऱ्या ऍपमुळे खळबळ

आम्हाला जगू द्या, मारू नका! म्हणण्याची वेळ आली पुण्यातल्या शिवसेनेवर

कोरोनामुळे २ हजार प्रवाशी क्रूझवर अडकले

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारपूर्वीही दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर या कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानने देशभरात अमलीपदार्थ व्यापाराविरुद्ध अनेक छापे टाकले आहेत.

Exit mobile version