28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरदेश दुनियातालिबानने केली १२ हजारा वंशीयांची हत्या

तालिबानने केली १२ हजारा वंशीयांची हत्या

Google News Follow

Related

तालिबान्यांनी १२ हजारा वंशीय नागरिकांची हत्या केली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या सदस्यांनी, ज्यांनी तालिबानसमोर आत्मसमर्पण केले होते. अशी माहिती एमनेस्टी इंटरनॅशनलने मंगळवारी दिली. एमनेस्टीने केलेल्या तपासणीनुसार, ११ अफगाणिस्तान राष्ट्रीय सुरक्षा दलातील जावं आणि दोन नागरीकांची तालिबानने हत्या केली आहे. त्यापैकी एक १७ वर्षीय मुलगी, मध्य अफगाणिस्तानातील दयकुंडी प्रांतातील काहोर गावात ३० ऑगस्ट रोजी घडली. तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर एमनेस्टीचे सरचिटणीस अग्नेस कॅलामार्ड म्हणाले, “हजारा लोकांना अशा पद्धतीने फाशी देण्याने हेच सिद्ध होते की तालिबान २.० वगैरे काही नसून पूर्वीचे क्रूर तालिबानच आहे.”

एमनेस्टीने सांगितले की, “दयकुंडीसाठी तालिबानने नियुक्त केलेले पोलीस प्रमुख सादिकुल्ला आबेद यांनी या हत्यांचे खंडन केले आहे. तालिबानचा एक सदस्य प्रांतातील हल्ल्यात जखमी झाला आहे. अफगाणिस्तानच्या ३ कोटी ६० लाख लोकसंख्येमध्ये हजारा ९ टक्के आहेत. त्यांना अनेकदा तालिबांकडून लक्ष्य केले जाते कारण ते सुन्नी बहुल देशात शिया मुस्लिम आहेत.

एमनेस्टीच्या अहवालानुसार, तालिबानने १४ ऑगस्ट रोजी दयकुंडी प्रांताचा ताबा घेतला आणि अंदाजे ३४ माजी सैनिकांनी खिदीर जिल्ह्यात समर्पण केलं. सरकारी लष्करी उपकरणे आणि शस्त्रास्त्रे असलेल्या सैनिकांनी तालिबानला शरण जाण्याचे मान्य केले. गटाच्या आत्मसमर्पणाचे नेतृत्व करणारे मोहम्मद अझीम सेदकत यांनी तालिबान सदस्यांच्या उपस्थितीत शस्त्रे नष्ट करण्याची व्यवस्था केली. एमनेस्टीच्या अहवालानुसार ३० ऑगस्ट रोजी डहाणी कुल गावाजवळ ३०० तालिबानी, लष्करी तंबूत आले, जिथे अफगाण सैनिक कुटुंबातील काही  सदस्यांसह राहत होते.

हे ही वाचा:

कोणाला मिळालं ‘हेलीकॉप्टर’ आणि कोणाला ‘शिलाई मशीन’?

मुंबई नाशिक प्रवास करता येणार अवघ्या दोन तासांत

शाळेत जाणाऱ्या शिक्षकांनाच झाली शिक्षा!

ईडीसमोर हजर राहण्यासाठी भावना गवळींना हवे अजून १५ दिवस!

तालिबानी लढाऊंनी सुरक्षा दलाच्या सदस्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना पकडले आणि जमावावर गोळीबार केला, ज्यामुळे मासुमा नावाच्या १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. एका सैनिकाने गोळीबार परतवला, यामध्ये एक तालिबानी दहशतवादी यामध्ये ठार झाला आणि दुसरा जखमी झाला. कुटुंबाने पळ काढल्याने तालिबानने गोळीबार सुरूच ठेवला, ज्यामध्ये दोन सैनिक ठार झाले, असे अहवालात म्हटले आहे. अहवालात असे म्हटले आहे की नऊ सैनिकांनी आत्मसमर्पण केल्यानंतर तालिबानने त्यांना जवळच्या नदीपात्रात नेले आणि त्यांची हत्या केली. Nम्नेस्टीने म्हटले आहे की त्याने हत्येनंतर घेतलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ पुराव्यांची पडताळणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा