संयुक्त राष्ट्रसंघात तालिबान?

संयुक्त राष्ट्रसंघात तालिबान?

तालिबानने संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७६ व्या सत्रात सहभागी होण्याचा अधिकार मागितल्यानंतर लगेचच, जागतिक समुदायाने या विनंतीला तीव्र विरोध दर्शविला. “अफगाणिस्तानच्या नवीन शासकांनी दाखवलेला हा प्रयत्न यशस्वी होणार नाही.” असंही म्हंटल जात आहे.

तालिबानने त्यांचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांची संयुक्त राष्ट्रातील अफगाणिस्तानचे नवीन राजदूत म्हणून नाव सुचवले होते. शाहीनचे नामांकन तालिबान आणि पूर्वीचे अफगाण सरकारचे दूत ग्राम इसकझाई यांच्यात थेट संघर्ष म्हणून बघितले जात आहे.

जर्मनीने तालिबानच्या विनंतीला विरोध दर्शविला आहे, दरम्यान, चीन, रशिया आणि पाकिस्तानने त्यांच्या मित्रत्वाचा हात तालिबानसाठी पुढे केला आहे.

“युनायटेड नेशन्समध्ये अशा पद्धतीचे नाटक करण्याचा काहीही उपयोग करणार नाही. तालिबानची कृती ही महत्वाची आहे, केवळ शब्दाला किंमत नाही.” असं जर्मन परराष्ट्र मंत्री हेइको मास यांनी बुधवारी सांगितले.

२० सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सामान्य चर्चेला सुरुवात झाली. याच्या पूर्वसंध्येला, सरचिटणीसांना ‘इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तान, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या’ लेटरहेडसह एक संदेश प्राप्त झाला होता. ज्यावर ‘अमीर खान मुत्ताकी’ यांनी ‘मंत्री म्हणून स्वाक्षरी केली होती.

पत्रात तालिबानने २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेच्या ७६ व्या सत्रात सहभागी होण्याची विनंती केली आहे.

हे ही वाचा:

‘ऑकस’नंतर बायडन-मॅक्रॉन “मैत्रीपूर्ण” फोन

क्वाड लवकरच भारतात बनवणार एक अब्ज लसी

मोदींच्या अमेरिका भेटीतून मिळणार सशस्त्र ड्रोन?

‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार

तालिबानने त्यांच्या पत्रात लिहिले की, “नवीन कायमस्वरूपी प्रतिनिधी, मोहम्मद सुहेल शाहीन यांना नामांकित केले आहे.” दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील रशियन स्थायी प्रतिनिधी वॅसिली नेबेन्झिया यांनी महासभेच्या वेळी स्पुतनिक वृत्तसंस्थेला सांगितले की तालिबानवरील निर्बंध माफ करणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यावर नाही.

तालिबानने गेल्या महिन्यात अफगाण संरक्षण दलांवर केलेल्या हल्ल्यात देशातील अशरफ घनी सरकार उलथून टाकले, १ मे पासून सुरू झालेल्या अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने नियंत्रण काबीज केले. १५ ऑगस्ट रोजी राजधानी काबूल बंडखोरांच्या ताब्यात आले. तालिबानने ६ सप्टेंबर रोजी पंजशीरच्या अहमद मसूद गटावर विजय मिळवण्याचा दावा केला आणि देश ताब्यात घेतला.

Exit mobile version