क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने अनपेक्षितपणे पाकिस्तानला धूळ चारत विश्वचषकातील आपला दुसरा विजय नोंदवला. पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव ठरला. तर, अफगाणिस्तानने पहिल्यांदा पाकिस्तानला हरवले त्यामुळे या विजयाचे सेलिब्रेशन अफगाणिस्तानच्या खेळाडूंसह जगभरात केले जात होते.
अफगाणिस्तानमध्येही त्यांच्या क्रिकेटमधील विजयाचा जल्लोष सुरू होता. मात्र, तालिबानी समर्थकांनी याला विरोध केल्याचे समोर आले आहे. तालिबान समर्थक अफगाणी नागरिकांना विजयाचा आनंद साजरा करू देत नसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक अफगाणी व्यक्ती आपल्या गाडीमधून फटाके वाजवत जात आहे. तर, त्याचवेळी एक तालिबानी त्याला अडवून, आपल्या हातातील काठीने मारहाण करत आहे. हबीब खान नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
Pakistani proxy, the Taliban, are not happy with Afghanistan’s win against their overload, preventing cricket fans from celebrating the victory in Kandahar. pic.twitter.com/xYzL93rKcN
— Habib Khan (@HabibKhanT) October 23, 2023
सोमवारचा पाकिस्तान विरुद्धचा विजय हा अफगाणिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा होता. अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने आतापर्यंत एकदाही इंटरनॅशनल वनडे क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानला हरवलं नव्हतं. त्यामुळे हा विजय विक्रमी होता.
हे ही वाचा:
चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले
शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!
देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!
कांदिवलीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू
सोमवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजीकरत पाकिस्तानने अफगाणिस्तानसमोर २८३ धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर आणि अफगाणिस्तानचा अनुभव लक्षात घेता ही धावसंख्या आव्हानात्मक होती. मात्र, अनपेक्षितपणे अफगाणिस्तानच्या संघाने उत्तम कामगिरी करत हा सामना खिशात घातला.