जुलमी तालिबानविरोधातील निदर्शकांना घातल्या गोळ्या

जुलमी तालिबानविरोधातील निदर्शकांना घातल्या गोळ्या

अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतर तेथे अराजक निर्माण झाले आहे. अशा वेळेला काही लोकांनी तेथे तालिबानचा निषेध करण्याच प्रयत्न केला होता.

तालिबानच्या क्रुरतेमुळे हजारो नागरिकांना अफगाणिस्तानला सोडून दुसऱ्या देशात आसरा घ्यायचा आहे. तालिबानला काही ठिकाणी विरोध होत आहे. काबुलमध्ये काही महिला आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या तसंच अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात बुधवारी लोक रस्त्यावर उतरले होते. जलालाबादमधील कार्यालयांवर तालिबानच्या झेंड्याऐवजी अफगाणिस्तानचा झेंडा फडकवण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.

हे ही वाचा:

उद्धवजी, एसटी कर्मचाऱ्यांना दारिद्र्यरेषेखाली सामावून घ्या!

ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?

जलालाबादमधील लोकांचा हा विरोध तालिबानला अजिबात रुचला नाही. त्यांनी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या. याबद्दल काही पत्रकारांनी व्हिडिओ ट्वीट केले होते. या आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या काही पत्रकारांनाही तालिबानने मारहाण केली.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेकडो नागरिक अफगाणिस्तानचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे. जमावाची पळापळ सुरु असताना गोळ्यांच्या फैरीचे आवाज ऐकू येतात. तालिबानचे काही लोक गर्दीच्या दिशेने गोळीबार करताना देखील दिसत आहेत.

तालिबानची जुलमी राजवट टाळण्यासाठी हजारो अफगाणि नागरिक देशाबाहेर जात आहेत. या परिस्थितीत अफगाणिस्तानात महिलांच्या एका गटाने रस्त्यावर उतरुन आपल्या हक्कांसाठी निदर्शने केली. निदर्शने चालू असताना तालिबानी आतंकवादी बंदुका घेऊन फिरताना दिसत आहेत.

Exit mobile version