तालिबानने अमेरिकन आणि अफगाण सैनिकांवर हल्ला करणाऱ्या आत्मघाती हल्लेखोरांच्या नातेवाईकांना जमिनीचे आश्वासन दिले आहे. तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी काबूलच्या एका हॉटेलमध्ये जमलेल्या बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या कुटुंबातील डझनभर सदस्यांना बक्षीस दिले आहे. असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते सईद खोस्ती यांनी मंगळवारी ट्विट केले.
सोमवारी संध्याकाळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना हक्कानीने “शहीद (अल्लाहच्या कामात मृत्युमुखी पडलेले) आणि फेदाईन (आत्मघाती हल्लेखोर)” च्या बलिदानाची स्तुती केली. आत्मघाती हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख करत खोस्ती यांनी ट्विट केले.
प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार हक्कानीला “इस्लाम आणि देशाचे नायक” म्हटले. बैठकीच्या शेवटी, त्याने प्रत्येक कुटुंबाला १० हजार अफगाणी (११२ डॉलर्स) वितरित केले आणि प्रत्येकाला जमिनीचे वचन दिले.
परराष्ट्र अधिकाऱ्यांशी तालिबानच्या उच्चस्तरीय बैठकांनी गरीब अफगाणिस्तानींना मदत मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कारण संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे की गंभीर आर्थिक संकटामुळे संपूर्ण लोकसंख्या दारिद्र्यात जाईल.
हे ही वाचा:
आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
आत्मघाती बॉम्बस्फोटांसाठी बक्षीस देण्याचे आश्वासन तालिबान नेतृत्वातील परस्परविरोधी दृष्टिकोन दर्शवते. ते स्वत:ला जबाबदार शासक म्हणून स्थान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे सर्वांना सुरक्षिततेचे आश्वासन देत आहेत आणि आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी गटाने म्हणजेच आयएसआयएस केने केलेल्या आत्मघाती हल्ल्यांचा निषेध केला आहे. दुसरीकडे, जेव्हा त्यांच्या अनुयायांचा प्रश्न येतो तेव्हा ते अशा कृत्यांचे कौतुक करतात.