क्रूर तालिबानींचा फतवा; अतिरेक्यांशी लावून देणार मुलींची लग्नं

क्रूर तालिबानींचा फतवा; अतिरेक्यांशी लावून देणार मुलींची लग्नं

१५ वर्षांपेक्षा मोठ्या मुली आणि ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विधवा आम्हाला द्या. हे वाचून एखाद्या सोळाव्या किंवा सतराव्या शतकातील परकीय आक्रमणाची आठवण जर तुम्हाला झाली असेल तर ते साहजिक आहे. पण ही मागणी आज २१व्या शतकात केली जात आहे. ही मागणी अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून उघडपणे केली जात आहे. या महिलांशी तालिबानच्या अतिरेक्यांचे लग्न लावून देण्याची योजनाही तालिबानने आखली आहे.

अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान दिवसेंदिवस अधिकाधिक भूभाग बळकावत आहे. अशावेळी तालिबानने पुन्हा इस्लामिक धर्मग्रंथांप्रमाणे नियम लादायला सुरुवात केली आहे. महिलांच्या शिक्षणावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. पुरुष सदस्य सोबत नसल्यास बाजारात जाऊन खरेदी करायलाही महिलांना मनाई केली आहे. महिलांच्या मानवी हक्काचं हनन पुन्हा एकदा निर्घृणपणे सुरु आहे. अत्यंत किरकोळ गुन्ह्यांसाठी दगडाने ठेचून मारण्यासारख्या क्रूर आणि मध्ययुगीन शिक्षा या पुन्हा रुजू केल्या जात आहेत.

हे ही वाचा:

पुणे-नाशिक प्रवास आता सुसाट

२०२२ पर्यंत देशाच्या सर्व सीमांवर कुंपण पूर्ण होणार

मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?

ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला

१५-४५ वयोगटाच्या महिलांना इस्लाम स्विकारायला लावून त्यांचा ‘निकाह’ तालिबानी दहशतवाद्यांशी लावून देण्याची योजना तालिबानची आहे. तालिबानची ही मागणी अत्यंत अमानवी आणि भीषण असली तरी धक्कादायक निश्चितच नाही. कारण १९९० च्या दशकात जेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा राज्य होते तेंव्हाही अशाच पद्धतीने महिलांना वागवले जात होते. तालिबानने जर पुन्हा ९०च्या दशकात केल्याप्रमाणे काबूलवर कब्जा केला, तर पुन्हा संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये महिलांचे आयुष्य नरकासमान होईल यात काहीच संशय नाही.

Exit mobile version