अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घ्यायला सुरूवात केल्यानंतर या देशात तालिबानचा जोर हळूहळू वाढत आहे. एकामागून एक महत्त्वाची शहरे तालिबानच्या ताब्यात जात आहेत. अफगाणिस्तानातील विविध प्रांतिक राजधान्या देखील तालिबानच्या हातात गेल्या आहेत. आणखी एक शहर पडल्याने तालिबानने काबूलच्या दिशेने कूच केले आहे.
तालिबानचा जोर अफगाणिस्तानात वाढत असून विविध महत्त्वाच्या शहरांवर तालिबानने आधीच कब्जा मिळवला आहे. आज काबूलच्या बाहेरच्या बाजूलाच असलेल्या, जवळच असलेल्या जलालाबाद शहरावर तालिबानने कब्जा केला आहे. त्यामुळे तालिबान आता अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या जवळ पोहोचला आहे.
अफगाणिस्तानातील केंद्रीय सरकारचा ताबा देशाच्या काही प्रांतांवरच राहिला आहे. एकूण ३४ प्रांतांपैकी सात तुटक प्रांतांवर अफगाणिस्तानच्या सरकारचा ताबा राहिला आहे, बाकी सर्व भूभाग तालिबानच्या ताब्यात गेला आहे. जलालाबाद तालिबानच्या हातात जाण्याने आता संपूर्ण अफगाणिस्तानच तालिबानच्या ताब्यात जाण्याचा धोका उद्भवला आहे.
हे ही वाचा:
‘वंदे भारत’ गाड्यांबाबत मोदींची मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ
तालिबानी आता काबूलपासून केवळ ११ किमी अंतरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे तालिबानी केव्हाही काबूलवर हल्ला करू शकतात असा धोका उद्भवला आहे.
गेल्या शनिवारी तालिबानने मझार-ए-शरिफ हे अफगाण सरकारचे महत्त्वाचे ठाणे देखील तालिबानच्या ताब्यात गेले. त्यामुळे उत्तरेच्या भागावर देखील तालिबानचा ताबा प्रस्थापित होऊ लागला आहे.
राष्ट्राध्यक्ष अश्रफ अफघाणी यांनी शनिवारी मझार-ए-शरिफ तालिबानच्या हातात गेल्याची बातमी नक्की होण्यापूर्वी देशाशी संवाद साधला होता. त्यावेळेला त्यांनी देशात पुन्हा एकदा सरकारचा ताबा प्रस्थापित करून शांतता निर्माण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र तालिबानच्या प्रभावापुढे ही गोष्ट अधिकाधीक अवघड होत जात असल्याचे दिसत आहे.