अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर, पंजशीर खोऱ्यावर पकड मिळवण्यासाठी झगडणाऱ्या तालिबानने आता मोठा दावा केला आहे. काबूलवरील कब्जानंतर जवळपास २० दिवसांनी आपण पंजशीर खोऱ्यावरही ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. मात्र अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेहने तालिबानचा हा दावा फेटाळून लावला आहे. अजूनही लढाई सुरुच असून, पाकिस्तानी मीडियाकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप अहमद अहमद मसूदने केला आहे.
News of Panjshir conquests is circulating on Pakistani media. This is a lie. Conquering Panjshir will be my last day in Panjshir, inshallah.
— Ahmad Massoud (@Mohsood123) September 3, 2021
गेल्या काही दिवसांपासून अहमद मसूद आणि फगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह या दोघांनी तालिबानविरुद्ध मोठा लढा उभारला आहे. त्यांना पंजशीर खोऱ्यात घुसूच दिलं नाही. सुरुवातीच्या काळात तालिबान आणि मसूद यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या, मात्र त्यातून काहीच निष्कर्ष निघाला नव्हता. त्यामुळे तालिबानने थेट पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी आपल्या दहशतवादी पाठवले होते.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पंजशीरवर ताबा मिळवल्याचं वृत्त तालिबानच्या हवाल्याने दिलं आहे. तीन तालिबानी नेत्यांच्या दाव्यानुसार, आता आम्ही पूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. यामध्ये पंजशीरचाही समावेश आहे.
तालिबानने संपूर्ण अफगाणवर ताबा मिळवला. अगदी अमेरिकेलाही माघार घेण्यास भाग पाडलं. मात्र, अफगाणिस्तानमध्येच एक असा प्रांत आहे ज्याच्यावर तालिबानला अद्यापही ताबा मिळवता आला नाही. या प्रांताचं नाव आहे पंजशीरचं खोरं. पंजशीरवर आत्ताच काय, याआधी सुद्धा २००१ ला तालिबानची सत्ता असतानाही तालिबानला या भागावर नियंत्रण मिळवता आलेलं नव्हतं.
पंजशीर खोरं अफगाणिस्तानची राजधानी काबुलपासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. पंजशीर खोरं हिंदुकुश पर्वतांच्या जवळ आहे. याच्या उत्तरेला पंजशीर नदी या भागाला उर्वरित अफगाणिस्तानपासून वेगळं करते. पंजशीरचा उत्तर भाग डोंगररागांनी वेढलेला आहे.
हे ही वाचा:
हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा
पॅरालिम्पिकमध्ये आता ‘या’ खेळात सुवर्णपदकाची आशा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
पंजशीर खोरं एकेकाळी शेर अहमद शाह मसूद यांचा गड होता. मात्र, २००१ मध्ये अमेरिकेत अल-कायदाने हल्ला करण्याआधी तालिबान्यांनी शेर अहमद शाह मसूद यांची हत्या केली होती. आता याच शेर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूदने तालिबान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत.