शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

राजधानी काबूलमध्ये बुधवारी काही महिलांनी निदर्शने केली.

शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना

अफगाणिस्तानात विद्यार्थ्यांचा परीक्षांवर बहिष्कार तर, शाळेत जाणाऱ्या मुलींचे रडून हाल. अफगाणिस्तानात सध्या महिलांवरील अत्याचार आणखी वाढले आहेत. आता तर त्यांना शिक्षणापासूनही वंचित ठेवण्यात येत आहे. अफगाणिस्तानात विद्यार्थिनींवर शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. याला पुरुषांनीही पाठींबा दिला आहे.आज माझ्या भविष्याशी जोडणारा एकमेव रस्ताही हयांनी बंद केल्याची खंत काबुलमधील एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

ब्रिटिश अफगाण सामाजिक कार्यकर्त्या  शबनम रसिमी यांनी अनेक ट्विट करत अफगाणिस्तानातील महिलांच्या अवस्थेची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली आहे. अफगाणिस्तानांत मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे तेथील महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही शिक्षकांनी याविरोंधात आपले राजीनामे सादर केले असून तेथील विद्यार्थिनींनी आज पदपथावर या विरोधात निदर्शने करून आपला रोष व्यक्त केल्याचे या आणि अशा व्हिडिओ मधून दिसून आले.

२० डिसेंबरला जेव्हा या विद्यार्थिनी आपल्या विद्यापीठात आणि कॉलेज मध्ये गेल्या होत्या तेव्हा त्यांना हाकलून लावण्यात आले. समाजमाध्यमांवरील एका व्हिडिओ मध्ये एक छोटी मुलगी तिची शाळा बंद होणार म्हणून खूप रडत आहे आणि तिचे वडील आपण घरीच अभ्यास करूया म्हणून तिची समजूत काढत आहेत. हा व्हिडिओ शबनम रसिमी यांनी आज एक ट्विट करत प्रसिद्ध केला आहे. त्यांनी अजूनही काही व्हीडिओ ट्विट करत तालिबानींचे मुलींच्या शिक्षण विरोधातील भूमिका या व्हिडिओमधून दाखवली आहे.तालिबानच्या या भूमिकेचा युनाइटेड नेशन्स आणि अमेरिकेने तीव्र विरोध केला आहे.

हे ही वाचा:

पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार

मुलगी बळी जाऊ नये म्हणून…

दमबाजी बंद करा,राजकीय दम दाखवा !

आता आपण करतोय जगाचं नेतृत्व !

दुसऱ्यांदा सत्ता हातात आल्यावर तालिबानींनी मुलींच्या शिक्षणाचा आणि त्यांचे सगळे हक्क सुरक्षित असल्याचा शब्द दिला होता पण आता ते त्यांचा शब्द पाळत नाही आहेत असे दिसते. दुःख असे आहे कि तालिबान हा एकमेव मुस्लिम देश आहे जो महिलांच्या शिक्षणाच्या विरोधात आहे.

Exit mobile version