तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा

तालिबानकडून महिलांना ‘अभय’ दिल्याची घोषणा

अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची पुन्हा राजवट आल्यानंतर आता परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे. जवळपास सगळा अफगाणिस्तान तालिबानींच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे नागरिकांची जीव वाचविण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे.

तालिबानने मात्र सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना अम्नेस्टी म्हणजेच अभय दिलं असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय महिलांनाही त्यांनी अभय देण्याचं वचन दिलं आहे. मात्र तालिबानचा इतिहास आणि तालिबानची वर्तणूक बघता कोणीही तालिबानच्या या आश्वासनांवर विश्वास ठेवायला तयार नाही.

अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर तालिबानी उभे असल्याने सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी सध्या फक्त हवाई मार्ग सुरक्षित आहे. अमेरिका, भारतासह विविध देश सध्या सैनिकी अभियान राबवून तेथील आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढत आहे. त्यामुळे जीवाचा धोका पत्करून काही लोकांनी विमानाच्या लँडिंग गिअरवर बसून निघून जाण्याचा प्रयत्न केला आहे.

तालिबानींची अन्यायकारक राजवट येणार हे लक्षात घेता नागरिकांनी विमानतळावर प्रचंड गर्दी केली आहे. एखाद्या एसटीच्या डेपोत बसमध्ये चढण्यासाठी जशी चेंगराचेंगरी होते, तसाच प्रकार काबुल विमानतळावर पाहायला मिळतो आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये विमानातही चेंगराचेंगरी

मुंबईत बसची चणचण, तर गुजरातमध्ये इलेक्ट्रिक बस

‘एवढी’ संपत्ती घेऊन घनी पळाले

राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे

यासंदर्भात एक व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्यात एका विमानात चढण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसते आहे. विमानात जाण्यासाठी शिड्यांवर चढून आत शिरण्याचा, त्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करणारे लोक दिसत आहेत. या जमावाला पांगविण्यासाठी तेथील अमेरिकन सैनिक हवेत गोळीबारही करत आहेत. पण आता त्या गोळ्यांच्या आवाजाकडेही लक्ष देण्यास कुणाकडे वेळ नाही.

Exit mobile version