काश्मीरची रहिवासी तजामुल इस्लाम हिने इतिहास रचत जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. १४ वर्षाखालील गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना काश्मीरच्या तजामुल हिने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तजामुलने या आधीही जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ती आठ वर्षांची असताना तिने देशासाठी जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
तजामुल इस्लाम ही जम्मू काश्मीरची रहिवासी आहे. २०१५ साली किक बॉक्सिंग खेळाची राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. तर त्यानंतर २०१६ साली तिने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा २०२१ मध्ये इजिप्तमधील कैरो येथे पार पडलेल्या जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेत तजामुल ही सुवर्ण पदक विजेती ठरली आहे.
हे ही वाचा:
‘त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे’
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
तजामुलच्या या कामगिरीसाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ट्विटरवरून तजामुल इस्लामचे अभिनंदन केले आहे. आपल्या युवा किक बॉक्सरने गेल्या काही वर्षात खूप उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तजामुल ही जम्मू-काश्मीरच्या बंदीपुरा भागाची रहिवासी आहे.