तैवानने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तैवानचे अध्यक्ष लाइ चिंग-ते यांच्यातील संभाषणावर चीनने केलेली टीका ‘अवास्तव हस्तक्षेप’ म्हणून फेटाळून लावली. भारत तैवानशी जवळचे संबंध ठेवण्यास उत्सुक असल्याबद्दल चीनने आक्षेप घेतला आहे. त्यावर तैवाननेही उत्तर दिले आहे.
‘मला खात्री आहे की मोदीजी आणि आमचे अध्यक्ष त्या प्रतिक्रियेने घाबरणार नाहीत’, असे तैवानचे उप परराष्ट्र मंत्री तिएन चुंग-क्वांग यांनी स्पष्ट केले. ‘भारताने गंभीर राजकीय वचनबद्धता दर्शवली आहे. त्यांनी तैवानच्या अधिकाऱ्यांच्या राजकीय समीकरणांना विरोध केला पाहिजे,’ असे म्हणत चीनने भारताकडे निषेध नोंदविला होता. मात्र चीनचे हे पाऊल म्हणजे ‘अवास्तव हस्तक्षेप’ असल्याची प्रतिक्रिया तैवानने दिली आहे.
‘एकमेकांचे अभिनंदन करणे ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. इतर लोकांना त्याबद्दल काही म्हणायचे का आहे, हे मला समजत नाही. सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ‘एक्स’ व्यासपीठावर एकमेकांचे अभिनंदन करणाऱ्या दोन नेत्यांमधील संभाषणामध्ये हा अत्यंत अवास्तव हस्तक्षेप आहे,’ असे उपपरराष्ट्रमंत्री म्हणाले.
हे ही वाचा..
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता खात्यात जमा!
आमने-सामने दोन मसीहा शरद पवारांकडे झुकले…
मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील ‘मन की बात’चा पहिला एपिसोड ३० जूनला !
तैवानचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाइ चिंग-टे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. याला ‘आम्ही परस्पर लाभदायक आर्थिक आणि तांत्रिक भागीदारीसाठी काम करताना निकटचे संबंध ठेवण्यास उत्सुक आहोत,’ अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली होती.