तैवानमध्ये दाेन दिवसात भूकंपाचे १०० पेक्षा जास्त धक्के

तैवानमध्ये भूकंपामुळे उडाला हाहाकार

तैवानमध्ये दाेन दिवसात भूकंपाचे १०० पेक्षा जास्त धक्के

रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यांचा थरथराट तर कुठे रस्त्यांना लांबच लांब पडलेले तडे, पूलच्या पूल तुटलेले तर रेल्वेरुळावरून घसरलेले डबे, काही ठिकाणी पडलेल्या तर काही ठिकाणी एका बाजुला कललेल्या इमारती हे चित्र आहे तैवानमधील. तैवानमध्ये रविवारी झालेल्या भूकंपाचे वेगवेगळे व्हिडीओ समाेर येत आहेत. त्यामध्ये ६.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने झालेले भयंकर नुकसान बघायला मिळत आहेत. गेल्या दाेन दिवसात तैवानमध्ये १०० पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसल्याने तैवानमधील नागरिक भेदरलेले आ हेत.

या भूकंपामध्ये जिवीतहानी झालेली नाही. परंतु नुकसान मात्र माेठ्या प्रमाणावर झाल्याचे बघायला मिळत आहे. भूकंपाचे धक्के शहराच्या उत्तरेला ५० किलोमीटर अंतरावर (स्थानिक वेळेनुसार) जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खाली होता. या भूकंपाचा रेल्वेसेवेला माेठा फटका बसला आहे. एका रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या गाडीचे डबे रुळावरच थरथरत असल्याचे दिसत आहे. तैवानच्या बऱ्याचशा भागात मेट्राे रेल्वेसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के शहराच्या उत्तरेला ५० किलोमीटर अंतरावर (स्थानिक वेळेनुसार) जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खाली होता. दोन मजली इमारत कोसळल्यानंतर दोन जखमींना वाचवण्यात आल्याचे सांगण्यात आले. भूकंपाच्या धक्क्यांनंतर एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत.

Exit mobile version