31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरक्राईमनामाब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत निघाल्या तलवारी, सुरे, लाठ्याकाठ्या

ब्रिटनमध्ये कबड्डी स्पर्धेत निघाल्या तलवारी, सुरे, लाठ्याकाठ्या

चार जणांना बंदुक बाळगल्याच्या आणि हिंसक कृती केल्याच्या संशयावरून अटक

Google News Follow

Related

डर्बी येथे कबड्डी सर्कल स्पर्धेदरम्यान मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचारात चार जण जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. यावेळी गोळीबारासह तलवारी, लाठ्याकाठ्या आणि चाकूने हल्ले करण्यात आले. या प्रकरणी चार पुरुषांना अटक करण्यात आली. यात जखमी झालेल्या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

 

कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेला हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनाही सशस्त्र प्रत्युत्तर द्यावे लागले. रविवारी संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार चारच्या सुमारास अल्वास्टन येथील ब्रिडल गेट लेन येथे ही घटना घडली. चार जणांना बंदुक बाळगल्याच्या आणि हिंसक कृती केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत, असे डर्बीशायर पोलिसांनी सांगितले.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये सुमारे ५० मुखवटाधारी पुरुष मोठ्या लाठ्याकाठ्या, मोठ्या तलवारी, चाकू घेऊन फिरताना दिसत आहेत. सुमारे सहा जणांच्या एका गटाने जमिनीवर पडलेल्या एका माणसाला घेराव घातला असून तो रक्तबंबाळ झाला आहे. तसेच, तो असहाय्य माणूस मदतीसाठी याचना करताना दिसत आहे. मात्र तो मदतीसाठी ओरडत असताना त्याच्यावर तलवारी आणि चाकूने वारंवार वार केले जात आहेत. तसेच, त्याला प्रथम गोळी मारण्यात आली होती, असेही या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे.

 

दुसर्‍या व्हिडीओमध्ये काही जण कार पार्किंगमधून पळून जाताना दिसत आहेत. तेव्हा बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज येत असून पुरुष चाकू आणि तलवारी घेऊन धावताना दिसत आहेत. या कार्यक्रमात ध्वजाच्या खांबांवर पिवळे खलिस्तानचे झेंडे दिसत आहेत.

 

हे ही वाचा:

फडणवीसांचे जपानमधून कांद्यावर लक्ष

उत्तर सापडले; म्हणून रजनीकांत योगी आदित्यनाथांचे पाया पडले

एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस

आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज

ही स्पर्धा इंग्लंड कबड्डी फेडरेशन (यूके) द्वारे आयोजित केली गेली होती. ही संस्था ‘ब्रिटनमधील गृह कार्यालयाद्वारे मान्यताप्राप्त कबड्डीची अधिकृत प्रशासकीय संस्था’ असल्याचे सांगते. युकेचे १६ कबड्डी क्लब त्याच्याशी संलग्न आहेत. इंग्लंड कबड्डी फेडरेशनचे सरचिटणीस सुरिंदर सिंग मानक यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘खेळपट्टीचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या बॅरिअर्सना दंगेखोर पार करू शकले नाहीत. कोणत्याही प्रेक्षकावर तसेच खेळाडूंवर हल्ला झाला नाही. तसेच, या हल्ल्यातही त्यांचा सहभाग नव्हता. प्राथमिक तपासात, मिडलँड्समधील दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे आढळले आहे,’ असे मानक यांनी निवेदनात नमूद केले आहे. या हल्ल्यातील सहभागी टोळ्यांचा कोणत्याही इंग्लंड कबड्डी फेडरेशनच्या संलग्न क्लबशी किंवा त्याच्या सदस्यांशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

ब्रिटनमध्ये सर्कल कबड्डी सोहळ्यात हिंसाचार होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मे २००७मध्ये, वेस्ट ब्रॉमविच येथील जसविंदर सिंग सहोता याला ग्रेव्हसेंड येथे एका कबड्डी स्पर्धेत साडेतीन फूट लांब तलवार फिरवल्यानंतर आणि सुरक्षा रक्षकाची बोटे कापल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आले होते. सन २०१६मध्ये गृह कार्यालयाने युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या कबड्डीपटूंना इंग्लंड कबड्डी फेडरेशनच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिला जाणारा व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तोपर्यंत पंजाबसह भारतातून दरवर्षी सुमारे १०० व्यावसायिक खेळाडू येथे येत असत. परंतु २०१९मध्ये हा नियम शिथिल करण्यात आला.

 

काहीजण या कबड्डी स्पर्धांवर टीकाही करत आहेत. ‘या कबड्डी स्पर्धा अमली पदार्थ विकण्याचे एक व्यासपीठ बनले आहे. या कबड्डी स्पर्धांना अनेक अवैध स्थलांतरित येतात. ते गाडीमध्ये तलवारी घेऊन जातात आणि त्यांची कोणीही तपासणी करत नाही. रविवारीदेखील सुरक्षा व्यवस्था तोकडी होती,’ असे एका कबड्डी चाहत्याने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा