स्वित्झरलॅन्डमध्ये रविवारी घेण्यात आलेल्या जनमतामध्ये बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने मतदान झाले आहे. या निर्णयाच्या समर्थकांनी असे सांगितले आहे की, स्वित्झरलॅन्डमध्ये इस्लामिक कट्टरतावादाच्या विरोधात हा जनतेने दिलेला कौल आहे. जनमताचा निकाल हा ५१.२१% या मताधिक्याने बुरख्यावर बंदी घालण्याच्या बाजूने लागला. या जनमतामध्ये एकूण ५०.८ टक्के मतदारांचा समावेश होता. यापैकी १४ लाख २६ हजार ९९२ मतदारांनी बंदीच्या बाजूने तर १३ लाख ५९ हजार ६२१ मतदारांनी बंदीच्या विरोधात मतदान केले.
सिरीयामधील २०११ साला नंतरच्या युद्धानंतर मध्यपूर्व आशियामधून १५ ते ३५ वयोगटाचे अनेक मुस्लिम पुरुष हे युरोपात शरणार्थी म्हणून गेले. विशेषतः जर्मनी आणि स्वीडन या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम शरणार्थी स्थलांतरीत झाले. यानंतर युरोपात अनेक ठिकाणी नव्याने स्थलांतरीत शरणार्थींकडून केले जाणारे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढू लागले. या प्रकरणांना पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात वाचा फुटली ती २०१५ च्या डिसेंबरमध्ये, जर्मनीतील कलोनमधील मोठ्या प्रमाणात महिलांविरुद्ध झालेल्या लैंगिक अत्याचाराने. कलोनमध्ये शेकडो महिलांवर, नववर्ष स्वागतासाठीच्या समारंभात, छेडछाड आणि बलात्कार करण्यात आले. यानंतर युरोपातील जनमानस अमुलाग्र बदलले आणि शरणार्थींसाठी अनुकूल असणारे वातावरण शरणार्थींविरोधातील झाले.
हे ही वाचा:
यानंतर २०२० मध्ये फ्रान्समध्ये देखील अनेक इस्लामी दहशतवादाच्या घटना घडल्या. ज्यातून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रोन यांना इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधात कठोर भूमिका घ्यावी लागली. स्वित्झरलँडमध्ये करण्यात आलेली बुरखाबंदी हीसुद्धा अशाच पद्धतीच्या इस्लामी कट्टरतावादाच्या विरोधातील एक पाऊल आहे.