स्वित्झर्लंडने ‘सार्को’ नावाच्या ‘आत्महत्या मशीन’ला कायदेशीर मान्यता दिली आहे. या मशिनच्या मदतीने वापरकर्त्याला वेदनाविरहितपणे मृत्यू देते. शवपेटीसारख्या आकाराच्या काचेच्या पेटीत हायपोक्सिया आणि हायपोकॅप्निया करून तुलनेने वेदनारहितपणे वापरकर्त्याला मृत्यू मिळतो.
अहवालानुसार या संपूर्ण प्रक्रियेस एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. इच्छामरण मशिनमधील प्रगतीचे हे ताजे उदाहरण आहे, ज्या देशांमध्ये इच्छामरण कायदेशीर आहे अशा देशांमध्ये एखाद्या व्यक्तीला कमीतकमी वेदनांसह लवकर मृत्यू होऊ देण्यासाठी हे उपकरण विशेषतः तयार करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द
झूम मिटिंगमध्ये ९०० कर्मचाऱ्यांना सांगितले, आज तुमचा शेवटचा दिवस
२२वी मिसाईल व्हेसल स्क्वॉड्रन ‘प्रेसिडंट स्टँडर्ड’ पुरस्काराने सन्मानित
लवकरच स्वदेशी ड्रोनविरोधी तंत्रज्ञान
इच्छामरणाच्या नैतिकतेबद्दल आणि अशा उपकरणांच्या वापराविषयी वादविवाद सुरू असले तरी, असे काही देश आहेत ज्यांनी दीर्घ आजारी रुग्णांची समस्या लक्षात घेऊन स्वेच्छेने मृत्यूला कायदेशीर मान्यता दिली आहे. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण कायदेशीर असून गेल्या वर्षी अंदाजे १ हजार ३०० लोकांनी डिग्निटास आणि एक्झिट सारख्या इच्छामरण संस्थांच्या सेवांचा वापर केल्याची नोंद करण्यात आली आहे.
अहवालानुसार सर्को मशीन स्वित्झर्लंडमध्ये कायदेशीर प्रक्रियेत उत्तीर्ण झाल्यामुळे, त्याचे निर्माते ते ठेवण्याची शक्यता असून पुढील वर्षापासून ते देशात कार्यरत होण्याची शक्यता आहे.