जलतरण तलाव कधी होणार ‘कोरोनामुक्त’?

जलतरण तलाव कधी होणार ‘कोरोनामुक्त’?

कोरानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जलतरण तलाव बंद आहेत. मात्र आता राज्य सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जलतरण संघटनेने राज्यातील जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी केली आहे.

जलतरण तलाव सुरू करण्यासंबंधीचे पत्र संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.  जलतरण हा खेळ कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय खेळला जातो. तसेच जलतरण तलावातील क्लोरिनयुक्त पाण्यामुळे कोरोनाचा फैलाव होत नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. गेल्या वर्षभरापासून जलतरण तलाव बंद असल्यामुळे अनेक खेळाडूंची कारकीर्द धोक्यात आली आहे. तसेच प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक मेजारी यांनी पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

छोटा शकीलच्या भावावर खंडणीचा गुन्हा

‘लसीकरणापूर्वी शाळा सुरू करता येऊ शकतात’

भारताने अफगाणिस्तानातून परत आणले १२९ नागरिक

केंद्रीय मंत्र्यांची आजपासून ‘जन आशीर्वाद’ यात्रा

अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू वीरधवल खाडेने जलतरण तलाव सुरू करण्यासंबंधी मागणी केली होती. राज्य सरकारने ८ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या नव्या नियमांमध्ये जलतरण तालावासंबंधी कोणतेही नियम आणि स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आवाहन मेजारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.

Exit mobile version