स्वीडनचे ‘नाटो, नाटो’…लवकरच सहभागी होणार!

तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोआन समर्थन देण्यास तयार

स्वीडनचे ‘नाटो, नाटो’…लवकरच सहभागी होणार!

Turkish President Tayyip Erdogan and Swedish Prime Minister Ulf Kristersson shake hands next to NATO Secretary-General Jens Stoltenberg prior to their meeting, on the eve of a NATO summit, in Vilnius, Lithuania July 10, 2023. REUTERS/Yves Herman/Pool

‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘नाटो’मध्ये सहभागी होण्याचा स्वीडनचा मार्ग मोकळा झाला आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोआन यांनी ‘नाटो’च्या सदस्यत्वासाठी स्वीडनचा प्रस्ताव ग्रँड नॅशनल असेंब्लीमध्ये सादर करून त्याला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आहे. ‘नाटो’चे महासचिव जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी याबाबत माहिती देऊन हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे नमूद केले. यामुळे नाटोचे सर्व सदस्य देश मजबूत आणि सुरक्षित होतील, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

तुर्कीचे राष्ट्रपती यांनी या संदर्भात सहमती दर्शवली असली तरी, या प्रस्तावाला त्यांना त्यांच्या देशाच्या संसदेच्या मंजुरीची गरज भासेल. ‘नाटो’चा सदस्य देश असणाऱ्या हंगेरीनेही स्वीडनच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. अर्थात हंगेरीचे पंतप्रधान विक्टर ओर्बन यांनी या संदर्भात लवकरच पाऊल टाकले जाईल, असे नमूद केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन आणि स्वीडनचे ‘नाटो’ संघटनेत स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

 

स्वीडनला ‘नाटो’मध्ये सहभागी करून घेण्यास गेल्या कित्येक वर्षांपासून तुर्कीचा विरोध होता. स्वीडन कुर्दी दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा तुर्कीचा आरोप होता. मात्र आता दोन्ही देशांमध्ये सामंजस्य झाले आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एकत्रित काम करणे आणि द्विपक्षीय व्यापारसंबंधांना प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन टॉपला; दहशतवादी संघटनांमधील भर्तीही झाली कमी

पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा

मार्ग मोकळा झाला; विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरच नियुक्ती

चीनच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर?

युरोपीय संघात तुर्कीला समाविष्ट करून घेण्यासाठी युरोपीय देशांनी मार्ग मोकळा करून देणे गरजेचे आहे, तरच तुर्की ‘नाटो’ सदस्यतेसाठी स्वीडनला समर्थन देईल. जसे आम्ही फिनलंडसाठी रस्ता मोकळा करून दिला, असे तुर्कीचे राष्ट्रपती तैयब एर्दोआन यांनी स्पष्ट केले आहे. युरोपीय संघात सहभागी होण्यासाठी तुर्की गेल्या ५० वर्षांपासून प्रयत्नशील आहे.

Exit mobile version