जगभरातूनच तंबाखूचा वापर कमी व्हावा, याबाबत जनप्रबोधन व्हावे, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे, २०२३चा दिवस जागतिक तंबाखूविरोधी दिन म्हणून जाहीर केला आहे. मात्र युरोपीय महासंघातील स्वीडन हा देश ‘धुम्रपानमुक्त देश’ म्हणून जाहीर होण्याच्या समीप पोहोचला आहे.
स्वीडनच्या लोकसंख्येपैकी पाच टक्क्यांहून कमी जण धूम्रपान करतात, असे आढळल्यास हा देश ‘धुम्रपानमुक्त देश’ म्हणून जाहीर केला जाईल. काही तज्ज्ञ यासाठी गेल्या काही दशकांपासून चाललेल्या धूम्रपानविरोधी मोहिमा आणि कायद्याचे यश मानत आहेत. तर काही धूररहित तंबाखू असलेल्या ‘स्नस’च्या वापराकडे लक्ष वेधत आहेत.
हे ही वाचा:
‘साक्षी साहिलचा उल्लेख करायची, आम्ही तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगायचो’
शिवतीर्थ हा गप्पांचा फड का बनलाय?
शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची दिमाखदार पालखी
आता ओटीटीवर तंबाखूविरोधी सूचना सक्तीची !
स्नस हा धूररहित तंबाखू असून त्याच्यावर युरोपिय महासंघातील अन्य देशांत बंदी असली तरी स्विडनमध्ये मात्र सिगारटेला पर्याय म्हणून त्याची जाहिरातबाजी केली जाते.
सध्या स्वीडनमधील अवघे ६.४ लोकसंख्या दररोज धूम्रपान करते. २०१९मध्ये हेच प्रमाण १९ टक्के होते. हे प्रमाण युरोपिय महासंघात सर्वांत कमी होते. तसेच, युरोपिय महासंघातील २७ देशांच्या तुलनेत सरासरी १८.५ टक्क्यांहून कमी होते.
स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेने सांगितल्यानुसार तिथपासून धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने घटत असून ते गेल्या वर्षी ५.६ टक्क्यांवर पोहोचले होते. ‘आम्हाला जगण्यासाठी निरोगी मार्ग हवा आहे, हेच यामागील कारण आहे. धूम्रपानामध्ये मला रस नाही. मला त्याचा वास आवडत नाही. मला माझ्या शरीराची काळजी घ्यायची रहे,’ असे येथील कॅरिटना ऍस्टरसन सांगते.
धूम्रपानामुळे शरीराच्या, आरोग्याच्या होणाऱ्या हानीची तरुण पिढीला पुरेपूर जाणीव आहे. २० वर्षांपूर्वी धूम्रपानविरोधी पावले उचलल्यामुळे संपूर्ण युरोपमधील सिगारेट्सचे दर उतरले होते. रेस्टॉरंटमध्येही धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली होती. फ्रान्समध्येही सन २०१४ ते २०१९ या कालावधीत धूम्रपानाचे प्रमाण घसरले. मात्र करोनाकाळात ताण वाढल्याने धूम्रपानाचे प्रमाण पुन्हा वाढले होते.
सन २०२१मध्ये फ्रान्समधील १८ ते ७५ वयोगटातील एक तृतियांश लोक धूम्रपान करत होते. सन २०१९च्या तुलनेत यामध्ये किंचित वाढ झाली आहे. ‘आम्ही सुरुवातीला सार्वजनिक जागी धूम्रपानावर बंदी आणली. नंतर शाळेची मैदाने, रेस्टॉरंट, कॅफे आणि बस स्टॉपवर धूम्रपानावर बंदी आणली,’ असे स्वीडिश कॅन्सर सोसायटीच्या सरचिटणीस अल्रिका अरेहेड यांनी सांगितले. तसेच, सिगारेटवर कर वाढवण्यात आले आणि अशा प्रकारच्या वस्तूंच्या जाहिरातबाजीवर कठोर निर्बंध लादल्यामुळेही चांगला परिणाम झाला,’ अशी माहिती त्यांनी दिली.