स्वीडननेही आत्मनिर्भरचेचा मार्ग स्वीकारला असून चीनवर अवलंबून न राहाता देशातच ५जी तंत्रज्ञानात विकसित करण्याचे ठरवले आहे. स्वीडनमधील ताज्या जनमत चाचणीनंतर चीनच्या हुवाई कंपनीला दूर ठेवायचा निर्णय स्वीडन सरकारने घेतले आहे.
स्वीडनच्या ५जी तंत्रज्ञानात चीनचा सहभाग असावा का? हे जाणून घेण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली. या जनमत चाचणीत स्वीडिश जनतेने एकमुखाने चीनविरोधी मतदान केले. चीनमध्ये मानवाधिकार आणि लोकशाहीवादी सुधारणा होण्याची गरज आहे असे मत स्वीडनच्या नागरिकांनी व्यक्त केले. स्वीडन सरकार लवकरच ५जी लिलावाला सुरुवात करणार असून यात चिनी कंपनींना बंदी घालण्यात आली आहे. स्वीडनच्या न्यायालयाने धुवाय आणि झेडटीसी या कंपन्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
५जी लिलावात चीन वर बंदी घालणारा स्वीडन हा पहिला देश नाही. या आधी अमेरिका आणि युनायटेड किंगडमने चिनी कंपन्यांवर अशाच पद्धतीची बंदी घातली आहे.