31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरदेश दुनियाफ्रान्समधील मार्सेलीस येथे उभारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा

फ्रान्समधील मार्सेलीस येथे उभारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा

-commemorate-historic-dive

Google News Follow

Related

फ्रान्समधील मार्सेलिसच्या अथांग समुद्रात १०२ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी झेप घेतली होती. ही एक ऐतिहासिक घटना होती. वीर सावरकरांपूर्वी असे धारिष्ट्य कोणी केले नाही आणि त्यांच्यानंतर कोणीही एवढे धैर्य दाखवू शकणार नाही. भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील ही अविस्मरणीय झेप एक अविभाज्य महत्त्व आहे, जी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे.मार्सेलिसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा स्थापन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

वीर सावरकरांच्या मार्सेलिस समुद्रातील उडीला ८ जुलै २०२२ रोजी ११२ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे कार्यक्रम पार पडला, त्यामध्ये वीर सावरकरांच्या भव्य तैलचित्राचे अनावरण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी फ्रान्समधील मार्सेलीस येथे ऐतिहासिक झेप घेणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता.

हे ही वाचा:

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात

सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’

अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?

या स्मारकाद्वारे नव्या पिढीसमोर आदर्श ठेवणे ही या मागील कल्पना होती. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कार्याध्यक्षाचा प्रस्ताव विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तत्परतेने स्वीकारला. या कामात आपण स्वतः लक्ष घालू आणि हा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडू असे आश्वासन दिले . त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पाठपुरावा करून केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला. गुरुवारी, २० ऑक्टोबर रोजी, या दोन नेत्यांच्या प्रयत्नांना आणि मोठे यश मिळाले. या प्रस्तावावर नवी दिल्ली येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा