अमेरिकेत हिंदू मंदिराला लक्ष्य करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी मंदिराचे नुकसान केले आहे. यानंतर या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. भारतीय वाणिज्य दूतावासानेही हे प्रकरण अमेरिकन प्रशासनासमोर मांडले आहे.
अमेरिकेमधील न्यूयॉर्कच्या मेलविले परिसरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात समाजकंटकांनी मंदिराचे नुकसान केले आहे. मेलविले मध्ये हिंदू मंदिराबाहेरील रस्त्यावर आणि प्रतिक चिन्हांवर स्प्रे पेंटने वादग्रस्त शब्द लिहिण्यात आले आहेत. अमेरिकन फाउंडेशनने या प्रकरणी न्याय विभागाने आणि गृह सुरक्षा विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने हे प्रकरण अमेरिकन प्रशासनासमोर मांडले आहे. भारतीय दूतावासने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तसेच या कृत्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन दुतवासाकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मुंबईत गणपती विसर्जनासाठी २५ हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भारताच्या पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन, ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ नावाने ओळख !
भारताच्या हॉकी संघाने दक्षिण कोरियाला नमवत अंतिम फेरीत मारली धडक !
उद्योगपतीला वाचविण्यासाठी तीन आयपीएस अधिकारी महिलेला छळत होते!
बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने म्हटलं आहे की, “द्वेष आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शांततेचे आवाहन केले पाहिजे. न्यूयॉर्कमधील मेलविले येथील श्री स्वामीनारायण मंदिराची विटंबना करण्यात आली. आम्ही या कृत्यांचा तीव्र निषेध करतो आणि सर्व समुदायांमध्ये शांततेसाठी प्रार्थना करतो. सर्वांसाठी शांतता, आदर आणि सद्भावना हा अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्याचा पाया आहे.”