न्यूज डंका एक्सक्लुझिव्ह
स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे गुरू आहेत. त्यांचे आणि माझे गुरुकुल (हिंदुत्व) एकच आहे, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. कारुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत कारुळकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौमधील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्या भेटीदरम्यान योगींनी आपले विचार प्रकट केले.
गेली ५३ वर्षे आदिवासी क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या कारुळकर प्रतिष्ठानच्या वतीने योगींना संस्थेच्या कार्याविषयी माहिती करून दिली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सचिव बाळाराव सावरकर यांनी लिहिलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा ग्रंथही योगी आदित्यनाथ यांना भेट दिला. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आदरभाव व्यक्त केला.
विवेक प्रकाशनच्या ‘संन्यासी योद्धा’ या योगी आदित्यनाथ यांच्यावरील ग्रंथाची प्रतही योगींना प्रदान करण्यात आली. या ग्रंथात योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेश मॉडेलने राज्याचे चित्र कसे पालटले यावर भाष्य करणारा लेखही प्रशांत कारुळकर यांनी लिहिला आहे. या ग्रंथाच्या प्रतिवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वाक्षरी करून शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा:
अनधिकृत बांधकामांचा शेवटचा दिवस ३१ ऑगस्ट
खबऱ्यांनी घेतला त्या आठही आरोपींचा अचूक शोध
चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!
गोरगरिबांसाठी केलेली मागणीही महाविकास आघाडीने फेटाळली
स्थानिक वनवासी चित्रकारांनी काढलेल्या वारली चित्रांची भेटही प्रशांत कारुळकर यांनी योगी आदित्यनाथ यांना भेट दिली. कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्याची योगींनी तारीफ केली आणि समाजासाठी, गोरगरिबांसाठी असेच अविरत कार्य करत राहा अशा शुभेच्छाही दिल्या.