अमेरिका हल्ल्यातील संशयित आयएसआयएसशी संबंधित; अमेरिकेच्या लष्करातही केले होते काम

अमेरिका हल्ल्यातील संशयित आयएसआयएसशी संबंधित; अमेरिकेच्या लष्करातही केले होते काम

जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स येथे घातपाताची घटना घडली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले असून त्यानंतर हल्लेखोरानी ट्रकमधून उतरून जमावावर बेछूट गोळीबार केला. या घटनेत किमान १५ लोक ठार झाले तर ३५ हून अधिक जखमी झाले आहेत. हा घातपात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर आता या घटनेत अपडेट समोर आली आहे.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने म्हटलं आहे की, या हल्ल्यातील संशयिताच्या ट्रकवर आयएसआयएसचा ध्वज होता. त्याने इतरांच्या मदतीने हे हत्याकांड घडवून आणले असावे असा दावा एफबीआयने केला आहे. संशयित हल्लेखोर शमसुद-दिन जब्बार याने प्रथम जमावावर हल्ला केला आणि नंतर गोळीबार केला. घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी तपास करताना पोलिसांना बंदुका आणि इतर उपकरणांसहित एक सुधारिक स्फोटक यंत्रही सापडलं आहे. तसेच त्याच्या वाहनावर आयएसआयएसचा झेंडा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले की, एफबीआयला असे काही व्हिडिओ सापडले जे हल्लेखोराने हल्ल्याच्या काही तास आधी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. यात त्याने म्हटले होते की, तो इस्लामिक स्टेट गटाकडून प्रेरित आहे आणि लोकांना मारण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच त्याला आयएसआयएसमध्ये सामील व्हायचे होते तसे त्याचे स्वप्न होते.

व्हिडिओंमध्ये, जब्बारने त्याच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले असून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने कुटुंबाला सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र आणण्याची योजना देखील बोलून दाखवली आहे. त्याने नंतर आपली योजना बदलली आणि तो आयएसआयएसमध्ये सामील झाल्याचे सांगितले.

माहितीनुसार, जब्बार हुस्टॉनमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत होता. त्याने त्याच्या एका व्हिडिओमध्ये बुमाँटमध्ये त्याचा जन्म झाल्याचं म्हटलं आहे. तसंच, अमेरिकेच्या लष्करात त्याने मानवी संसाधन आणि आयटीतज्ज्ञ म्हणून त्याने १० वर्षे काम केल्याचाही उल्लेख त्याने व्हिडिओत केला आहे. जब्बार हा मार्च २००७ ते जानेवारी २०१५ पर्यंत नियमित सैनिक होता आणि त्यानंतर जानेवारी २०१५ ते जुलै २०२० पर्यंत आर्मी रिझर्व्हमध्ये होता. त्याला फेब्रुवारी २००९ ते जानेवारी २०१० पर्यंत अफगाणिस्तानात तैनात केले होते आणि स्टाफ सार्जंट पदावरून तो शेवटी निवृत्त झाला.

हे ही वाचा : 

बांगलादेश न्यायालयाने हिंदू साधू चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला!

सोडणार नाही, फडणवीस गरजले !

सात महीने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर…

क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी गजाआड!

घटना नेमकी काय?

बुधवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) सेंट्रल न्यू ऑरलियन्समध्ये लोक नववर्षाच्या स्वागतासाठी जमले होते. यावेळी लोकांच्या गर्दीत ट्रक घुसल्याने किमान १५ लोक ठार आणि ३५ हून अधिक जखमी झाले आहेत. पहाटे ३.१५ च्या सुमारास बोरबॉन स्ट्रीट आणि इबरव्हिलच्या भागात ही घटना घडली. हा परिसर त्याच्या गजबजलेल्या नाइटलाइफसाठी ओळखला जातो.

Exit mobile version