प्रसिद्ध अभिनेत्री आणि जगतसुंदरी सुश्मिता सेन हि समाजमाध्यमांवर खूपच सक्रिय आहे. आज तिने इंस्टाग्रामवर आपल्या चाहते आणि मित्र मैत्रिणींना एक फोटो टाकत लिहिले आहे ” तुमचे हृदय आनंदी आणि धैर्यवान ठेवा आणि जेव्हा तुम्हाला शोनाची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते तुमच्या पाठीशी उभे राहतील “माझ्या वडिलांचे हे छान शब्द आहेत. असे लिहिले आहे.
पुढे तिने असेही लिहिले आहे कि, मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता आणि माझी अँजिओप्लास्टी झाली , माझे स्टेण्ट जागेवरच असून सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ज्ञांनी सांगितले कि ,”माझे हृदय विशाल आहे”पुढे सुश्मिताने आपल्या शुभचिंतकांचे आभार मानत लिहिले आहे कि, बऱ्याच लोकांनी वेळेवर केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत.
Just posted a photo https://t.co/HDxtEfrrKB
— sushmita sen (@thesushmitasen) March 2, 2023
४७ वर्षीय सुश्मिताने पुढे लिहिले आहे कि, हि पोस्ट फक्त तुम्हाला चांगली बातमी कळवण्यासाठी आहे कि सर्व काही ठीक आहे आणि मी पुन्हा माझ्या आयुष्यात पुढे जाण्यास तयार आहे. सुश्मिता हि अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या कामाबरोबरच आपल्या फिटनेसची पण काळजी घेते आपल्या सोशल मीडियावर ती व्यायामाचे , स्वतःच्या वर्क आऊट चे व्हिडिओ आणि फोटो नेहमीच शेअर करत असते.
हे ही वाचा:
आठवलेंच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाने काय केले, नागालँडमध्ये…
‘क्वालिटी सिटी उपक्रमांत’ देशात मिळाला नाशिकला पहिला मान
६० वर्षानंतर प्रथमच एका महिलेला आमदारकीचा मान
आता पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्षनेता करणार निवडणूक आयुक्ताची निवड
मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुश्मिताने काय म्हंटले ?
काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. माझ्यावर अँजिओप्लास्टी झाली असून , आता माझी प्रकृती स्थिर आहे. योग्य उपचारांबद्दल मला धन्यवाद मानायचे आहेत. सध्या ऑल इज वेल आहे. माझी तब्बेत आता छान आहे. नव्या आयुष्यासाठी मी सज्ज आहे.