नुपूर शर्माप्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायाधीशांबद्दल सोशल मीडियात संताप

नुपूर शर्माप्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे न्यायाधीशांबद्दल सोशल मीडियात संताप

न्यायाधीश जे बी पारडीवाला आणि सूर्य कांत यांनी नुपूर शर्मा प्रकरणी केलेल्या वक्तव्यांमुळे देशभरात संतापाची लाट आली आहे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात एका टीव्ही चॅनलवर केलेल्या वक्तव्यानंतर रोष व्यक्त झाला होता. त्यावरून विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते.

नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती, त्यात विविध राज्यांत त्यांच्याविरोधात जे गुन्हे दाखल झाले आहेत ते एकत्रितपणे दिल्लीत हस्तांतरित करण्यात यावेत. कारण तिच्या जीवाला धोका असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी जाणे शक्य होणार नाही.

त्यावर जे बी पारडीवाला आणि सूर्यकांत यांनी म्हटले की, तुम्ही जिभेला लगाम न घातल्यामुळे देशात ही परिस्थिती उद्भवली आहे. संपूर्ण देशात त्यामुळे आगडोंब उसळला आहे. न्यायाधीशांच्या या वक्तव्यांवरून सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. त्याविरोधात थँक यू मि. कांत अशी एक मोहीम चालविण्यात येत असून हा पाकिस्तान आहे का, इथे शरिया लागू झाला का, अशी विचारणा सोशल मीडियात होत आहे.

नुपूर शर्मा यांनी म्हटले होते की, मला सातत्याने ठार मारण्याच्या धमक्या विविध राज्यांतून येत असून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे सगळे गुन्हे एकत्रितपणे दिल्लीत हस्तांतरित करण्यात यावेत.

नुपूर शर्मा यांनी जे वक्तव्य चॅनलवर केले होते त्याबद्दल त्यांनी माफी मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्तेपदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती तसेच त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले होते.

न्यायाधीशांनी मात्र नुपूर शर्मा यांच्या माफीनाम्याबाबत म्हटले की, त्यांची माफी उशिरा आली. शिवाय, धार्मिक भावना दुखावल्या असतील तर अशी अटही त्यांनी घातली. त्यापेक्षा नुपूर शर्मा यांनी त्वरित टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागावी. ते म्हणाले की, नुपूर शर्मा या एका पक्षाच्या प्रवक्त्या असल्यामुळे सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे.

हे ही वाचा:

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी

शिवसेनेला ‘सर्वोच्च’ दणका; आमदार अपात्रतेच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीला नकार

“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला ठाकरेंना पाहवत नाही”

२६ मे रोजी एका वाहिनीवर नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वक्तव्य केले होते. त्यावरून तब्बल आठवडा दोन आठवड्यांनी देशभरात संताप उफाळला. हा सगळा प्रकार पूर्वनियोजित होता, याचीही चर्चा झाली. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट टाकणाऱ्या कन्हैय्यालाल या टेलरिंग दुकानदाराचा तर शिरच्छेद करण्याची निघृण हत्या उदयपूर, राजस्थान येथे घडली.

नुपूर शर्मा यांचे वकील मणिंदर सिंग यांनी म्हटले होते की, शर्मा यांनी तात्काळ माफी मागितली होती त्यावर या खंडपीठाने म्हटले की, या प्रकारचे लोक एक अजेंडा राबवतात आणि प्रसिद्धी मिळविणे हा त्यांचा उद्देश असतो. शिवाय, विविध राज्यात असलेले गुन्हे एकत्र करण्याची शर्मा यांची याचिकाही न्यायालयाने स्वीकारली नाही. उलट, ही याचिका त्यांनी मागे घ्यावी अशी सूचना न्यायालयाने केली.

पारडीवाला आणि सूर्यकांत यांनी असेही म्हटले की, देशात सध्या जे काही घडत आहे त्याला ही महिलाच जबाबदार आहे. आम्ही ती चर्चा ऐकली आहे.

Exit mobile version