दिवसातले २० तास काम करण्याचे रहस्य काय?

फ्रान्स दौऱ्यावर असताना तरुणाचा मोदींना प्रश्न

दिवसातले २० तास काम करण्याचे रहस्य काय?

फ्रान्सच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या अगत्याने स्वागत केले गेले होते. येथील स्वागत सोहळ्यानंतर मोदी पॅरिस हॉटेलच्या बाहेर पोहोचले. तेव्हा तिथे मोठ्या संख्येने भारतीय जमले होते. या वेळी भावूक झालेल्या तरुणाने मोदींना प्रश्न विचारला की, तुम्ही दिवसातले २०-२० तास काम कसे करू शकता? यामागचे रहस्य काय? हा प्रश्न ऐकून मोदी केवळ हसले.

याच दरम्यान एक महिला मोदी यांना भेटून खूप भावूक झाली होती. पंतप्रधान मोदींना भेटून त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते. त्यानंतर मोदी यांनी त्या महिलेला धीर दिला. त्या दरम्यान उपस्थित भारतीयांनी ‘भारतमाता की जय’चे नारे दिले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्सच्या ९९ वर्षांच्या प्रख्यात योगशिक्षिका शार्लोट चोपिन यांची भेट घेतली. तसेच, भारताच्या प्राचीन पद्धतीचा ध्यास आणि ९९ व्या वर्षी तंदुरुस्त राहण्याच्या त्यांच्या निर्धाराचे कौतुक केले.

हे ही वाचा:

धारावी झोपडपट्टीचे रुपडे लवकरच पालटणार!

पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱ्या ‘वॅगनर’च्या म्होरक्याचा मृत्यू?

नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा नाही म्हणत राऊतांनी पायावर धोंडाच मारला

अश्विनच्या माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघ ढेपाळला

पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासोबत शुक्रवारी विशेष पाहुणे म्हणून फ्रान्सच्या बॅस्टिल दिवस परेडमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी ट्वीट केले. ‘पॅरिसमध्ये मला शार्लोट चोपिन यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांनी ५०व्या वर्षी योगसाधनेला सुरुवात केली. त्या लवकरच १०० वर्षांच्या होणार आहेत आणि दरवर्षी त्यांची योगप्रति साधना वाढत असून प्रकृतीही उत्तम होत आहे,’ असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version