‘न्यूजक्लिक’ या वेब पोर्टलला सन २०१८ ते २०२१ दरम्यान नेविल रॉय सिंघम या अमेरिकास्थित उद्योजकाशी संबंधित विविध संस्थांकडून २९ कोटी २९ लाख रुपये मिळाल्याचे आढळून आले होते. या अमेरिकी उद्योजकावर चीनधार्जिणा प्रचार केल्याचा आरोप आहे. तसेच, सिंघम याने सन २०१७ मध्ये विकलेल्या कंपनीकडूनही काही निधी न्यूजक्लिकला मिळाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. ‘न्यूजक्लिक’ या पोर्टलला मिळालेल्या विदेशी निधीच्या बाबतीत ईडीने अमेरिकन उद्योजक नेव्हिल रॉय सिंघम याला समन्स जारी केले आहेत. एएनआयने ही माहिती दिली आहे.
ईडीने समन्स बजावून नेव्हिल रॉय सिंघम याला चौकशीसाठी बोलावले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने चीनशी संबंधित कंपन्यांना निधी देण्याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये नेविल रॉय सिंघमचेही नाव आले होते. याप्रकरणी ईडीने छापेही टाकले होते. दिल्लीतील अनेक पत्रकारांच्या आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाने छापे टाकले होते. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह संजय राजोरा, भाषा सिंह, उर्मिलेश, प्रबीर पुरकायस्थ, सोहेल हाश्मी यांच्या घरीही पोलिसांनी धाड टाकली होती. शिवाय अनेक पत्रकारांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. हे सर्व पत्रकार न्यूज क्लिकशी संबंधित होते.
हे ही वाचा:
उत्तरकाशी बोगद्यातील कामगारांच्या बचावासाठी दिल्लीहून आले ‘ऑगर ड्रिलिंग मशीन’!
शेहला रशीद म्हणते, काश्मीर म्हणजे गाझा नाही, श्रेय मोदी, शहांचे!
ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!
उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे
प्रकरण नेमकं काय?
‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील एका रिपोर्टमध्ये नेव्हिल रॉय सिंघम याने ‘न्यूज क्लिक’या संस्थेला आर्थिक मदत केली. तसेच त्याचा संबंध चिनी कम्युनिस्ट पक्षाशी असल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेव्हिल रॉय सिंघमच्या नेटवर्कनं चुकीच्या माहितीला प्रोत्साहन दिलं आणि चीन समर्थक संदेशांचा प्रचार करून मुख्य प्रवाहातील काही प्रकरणांवर प्रभाव टाकला.