तालिबानने आत्मघाती बॉम्बर्सची एक विशेष बटालियन तयार केली आहे. ही बटालियन अफगाणिस्तानच्या सीमेवर विशेषतः बदाखशान प्रांतात तैनात केली जाईल, असे अहवालात म्हटले आहे.
ताजिकिस्तान आणि चीनच्या सीमेला लागून असलेल्या बदाखशानच्या ईशान्य प्रांतात आत्मघाती हल्लेखोरांच्या बटालियनच्या निर्मितीबद्दल प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर मुल्ला निसार अहमद अहमदी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. ही माहिती खामा प्रेसने दिली आहे.
अहमदी म्हणाले की, “बटालियनचे नाव लष्कर-ए-मन्सूर (‘मन्सूर आर्मी’) आहे. त्यांना देशाच्या सीमेवर तैनात केले जाईल.” ते पुढे म्हणाले की, “बटालियन पूर्वीच्या अफगाणिस्तान सरकारच्या सुरक्षा दलांना लक्ष्य करून आत्मघाती हल्ले करणार आहे.”
“ही बटालियन नसती तर अमेरिकेचा पराभव शक्य झाला नसता. हे “शूर” पुरुष स्फोटक कमरेवर घालतील आणि अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या तळांवर स्फोट करतील. हे असे लोक आहेत ज्यांना अल्लाहच्या इच्छेसाठी स्वतःला वाहून घेण्याची अजिबात भीती नाही.” खामा प्रेसनुसार अहमदी म्हणाले.
हे ही वाचा:
कोस्टल रोडच्या कामात भ्रष्टाचाराचा तवंग
चीनची तैवानवर हवाई हल्ल्याची तयारी
इराण-अझरबैजान युद्धाची ठिणगी पडली?
अंधेरीत भाजयुमो कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला
लष्कर-ए-मन्सूरीसह, बद्री ३१३ ही आणखी एक बटालियन आहे जी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या सर्वात सुसज्ज आणि आधुनिक लष्करी गटांपैकी एक म्हणून ओळखली जाते. खामा प्रेसनुसार बद्री ३१३ मध्ये सर्व आत्मघाती हल्लेखोरांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.