पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार पोलिसांचाही समावेश आहे. या स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.
इस्लामाबादमध्ये एका कारमध्ये आत्मघाती स्फोट झाला. पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करत असताना एका संशयास्पद कारला थांबण्याचा इशारा करण्यात आला. गाडी थांबताच त्यात बसलेल्या व्यक्तीने स्वत:ला उडवले. मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये चार पोलिस आणि दोन नागरिकांचा समावेश आहे. कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) या वर्षी जूनमध्ये केलेल्या सरकारसोबत अनिश्चित काळासाठीचा युद्धविराम मागे घेतल्यानंतर काही दिवसांनी हा आत्मघातकी स्फोट झाला आहे.
हे ही वाचा :
आम्ही करू ते कौतुक, तुम्ही कराल तो अपमान
आज ४०५ खेळाडूंवर होणार बोली, ‘हे’ खेळाडू होऊ शकतात मालामाल
शिकलात तर याद राखा! अफगाणिस्तानात विद्यापीठे, लायब्ररीतून हाकलले महिलांना
पश्चिम रेल्वे करणार ६ गाड्यांचा विस्तार
शुक्रवारी सकाळच्या सुमारास पोलिसांना या परिसरात एक संशयास्पद वाहन दिसले. गाडीत एक पुरुष आणि एक महिला होती. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी कार थांबवली तेव्हा कारमधील दोघेही बाहेर पडले. अधिकारी कारचा शोध घेत असताना, त्या व्यक्तीने गाडीच्या आत जाऊन स्वत:ला उडवले, असे पोलीस अधिकारी सोहेल जफर यांनी सांगितले. आत्मघातकी स्फोटात हेड कॉन्स्टेबल आदिल हुसैन यांचा मृत्यू झाला आहे.