चिनी नागरिकांना लक्ष्य करून कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आत्मघाती हल्ला

हल्ल्यात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू तर १० जण जखमी

चिनी नागरिकांना लक्ष्य करून कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आत्मघाती हल्ला

पाकिस्तानमधील कराची विमानतळाबाहेर झालेल्या भीषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या भीषण स्फोटात किमान दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाबाहेर एका टँकरचा स्फोट झाला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र, हा आत्मघातकी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चिनी नागरिकांना लक्ष्य करून केलेला हा हल्ला होता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर रात्री ११ वाजताच्या सुमारास एका टँकरचा स्फोट झाला. यावेळी पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनी (प्रायव्हेट) लिमिटेडच्या चिनी कर्मचाऱ्यांना घेऊन ताफा प्रवास करत होता. त्यांच्यावर हल्ला झाल्याचे पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने निवेदनात म्हटले आहे. यात दोन चिनी नागरिक मरण पावले, तर १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने पाकिस्तानला या हल्ल्याची कसून चौकशी करण्याची, गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. तसेच पाकिस्तानमधील चिनी दूतावासाने निवेदनात म्हटले आहे की, या कठीण काळात आम्ही जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमच्या संवेदना व्यक्त करतो.

इस्लामाबादहून दासू येथील कर्मचाऱ्यांना छावणीकडे घेऊन निघालेल्या चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवले तेव्हा ही घटना घडली, अशी माहिती आहे. या घटनेनंतर, प्रतिबंधित संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) आत्मघातकी बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

हे ही वाचा : 

दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ – शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी!

‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!

बापरे! महिलेच्या पोटातून निघाला २ किलोचा ‘केसांचा गोळा’

भोपाळमधून १,८०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, दोघांना अटक!

सध्याच्या घडीला हजारो चिनी कामगार पाकिस्तानात विविध प्रकल्पांवर काम करण्यासाठी तेथे आहेत. त्यापैकी बहुतेक बीजिंगच्या अब्ज डॉलरच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मध्ये सामील आहेत जे दक्षिण आणि मध्य आशियाला चीनच्या राजधानीशी जोडतात. पाकिस्तानमधील या चीन धार्जिण्या प्रकल्पांना बलुचिस्तानमधून विरोध असून याचा निषेध म्हणून वारंवार या प्रकल्पांच्या ठिकाणी आणि तिकडच्या कर्मचाऱ्यांवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून हल्ले केले जातात.

Exit mobile version