पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

दिव्यांगांच्या पॅरा राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडू सुधीरची सुवर्णपदकाला गवसणी

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरची ‘सुवर्ण’ कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरू असून आता दिव्यांगांच्या पॅरा राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताची उत्तम सुरुवात झाली आहे. दिव्यांगांच्या पॅरा राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या नावे सुवर्णपदकाची नोंद झाली आहे. भारताचा पॉवरलिफ्टर सुधीर याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक कमावले आहे. या पदकामुळे भारताच्या खात्यात आता सहा सुवर्णपदक झाली आहेत.

पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर हा सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने १३४.५ गुण मिळवले तसेच संपूर्ण स्पर्धेत अव्वल क्रमांक सुधीरने स्वतःकडे ठेवला. सुधीर याने दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले. मात्र, शेवटच्या प्रयत्नात २१७ किलो वजन उचलायला सुधीरला अपयश आले. नायजेरियाच्या ख्रिश्चन ओबिचुकवू याला रौप्य पदक मिळाले तर स्कॉटलंडच्या मिकी युलने कांस्यपदक जिंकले.

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण २० पदकं आपल्या खात्यात जोडली आहेत. या २० पदकांसह राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सातव्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये ग्रेनेड हल्ल्यात मजुराचा मृत्यू

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर

राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकणारे भारतीय खेळाडू

सुवर्णपदक- सहा पदक

खेळाडू-  मीराबाई चानू, महिला लॉन बॉल संघ, अंचिता शेउली, जेरेमी लालरिनुंगा, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर

रौप्यपदक- सात पदक

खेळाडू- बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, संकेत सरगर, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, मुरली श्रीशंकर, तुलिका मान

कांस्यपदक- सात पदक

खेळाडू- गुरुराजा पुजारी, लवप्रीत सिंह, हरजिंदर कौर, विजय कुमार यादव, सौरव घोषाल, तेजस्वीन शंकर, गुरजीत सिंह

Exit mobile version